Palghar Accident News : बोईसर नवापूर रस्त्यावर Car आणि Bike ची धडक, कामावरून घरी निघालेल्या दाेघांचा मृत्यू

बाेईसर पाेलीसांची तपास सुरु आहे.
Palghar Accident News
Palghar Accident Newssaam tv

Palghar News : बोईसर नवापूर रस्त्यावरील (boisar navapur road) पाम येथे भरधाव कारने (car) बाईकस्वारांना (bike) चिरडले. या अपघातात (accident) दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती. (Maharashtra News)

Palghar Accident News
Gokul Dairy Chairman Resigns : गाेकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, उलट सुलट चर्चांना उधाण; विश्वास पाटलांकडून पुर्णविराम

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी - तारापूर औद्योगिक वसाहतीमधून बाईकस्वार कामावरून घरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्यामुळे बाईकस्वार रस्त्यावरच काेसळले.

Palghar Accident News
MPSC Exam Updates : MPSC परीक्षेत बदल !; आता MCQ स्वरूप नसणार | New Pattern of MPSC Exam

या घटनेत दाेघांचा मृत्यू झाला आहे. नरेंद्र बारी ( 45) आणि रुपेश बारी अशी मृतांची नावे आहेत. नरेंद्र बारी यांचा जागेवरच मृत्यू झाला तर रुपेश बारी यांचा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. या अपघातामधील कार चालकाला ताब्यात घ्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांकडून हॉस्पिटल आणि पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला. बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाेलिस तपास सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com