Gujrat Colgate Scam Saam Tv
क्राईम

Toothpaste Scam Alert : तुम्ही बनावट टूथपेस्ट तर वापरत नाही? कारण आले समोर, वाचा नेमकं प्रकरण काय आहे

Gujarat Colgate Scam : गुजरातमध्ये बनावट कोलगेट तयार करणारा कारखाना उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकून ९ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. बनावट आणि ओरिजनल कोलगेट कसे ओळखावे हे जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात बनावट कोलगेटचा कारखानाचा पर्दाफाश

  • पोलिसांनी ९ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे

  • कॉपीराइट कायद्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

नागरिकांनो सावधान! तुमच्या वापरात असलेलं कोलगेट बनावट आहे की ओरिजनल हे तुम्हाला माहिती आहे का ? नाही, तर ही बातमी तुमच्यासाठी. गुजरातमधून बनावट कोलगेट प्रकरणाचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी धाड टाकून बनावट कोलगेट प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ९ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील रापर तालुक्यातील चित्रोड गावात बनावट कोलगेटचा कारखाना सुरु होता. या कारखान्यात हुबेहूब ओरिजनल कोलगेट बॉक्स सारखे बॉक्स तयार करून त्यामध्ये बनावट कोलगेट विकली जात होती. याप्रकरणी माहिती मिळाल्यावर गागोदरा पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली.

या कारखान्यातून ९ लाख रुपये किमतीचा माल मोठ्या जप्त करण्यात आला. या कारवाईत जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ५०० हून अधिक डुप्लिकेट कोलगेट पॅकेट्स, रासायनिक मिश्रण कंटेनर, पॅकेजिंग मशीन आणि बनावट लेबल प्रिंटर यांचा समावेश होता. कॉपीराइट कायदा १९५७ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गागोदरा पोलिसांनी सांगितले की, एका गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी बनावट कोलगेट कारखाना उघडकीस आणला. पोलिसांनी कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या चौघांच्या शोधात आहेत. दरम्यान तुम्हीही तुमच्या वापरातील कोलगेट म्हणजेच टूथपेस्ट बनावट आहे कि ओरिजनल हे आजच तपासा.

ओरिजनल कोलगेट कसे ओळखाल ?

  • पॅकेटवरील घटकांची यादी बघा.

  • घातक रसायन असल्यास ते कोलगेट घेणं टाळा.

  • टूथपेस्ट चव आणि रंग साधा असावा, खूप वेगळा असेल तर लगेच तपासणी करा.

  • टूथपेस्टमध्ये फ्लोराइड आहे का ते तपासा; कमी-जास्त असेल तर बनावट असू शकते.

  • टूथपेस्टचा वास चांगला आणि सौम्य असावा; तीव्र वास असल्यास सतर्क व्हा.

  • विश्वासू दुकानातूनच खरेदी करा; स्वस्त भावात घेणं जीवावर बेतू शकत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT