Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

Pune Crime News : पुण्यात बिटकॉइन आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडेचार कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. हडपसर, मांजरी आणि कोंढवा भागात ही घटना घडली आहे.
Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Pune Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात बिटकॉइन आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आली आहे

  • साडेचार कोटी रुपयांचा मोठा सायबर घोटाळा उघडकीस आला आहे

  • हडपसर, मांजरी आणि कोंढवा भागातील तरुण व व्यावसायिक यांना कोटींचा गंडा

  • पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

अक्षय बडवे, पुणे

पुण्यासारख्या उच्चशिक्षित शहरात धक्कदायक प्रकार घडला आहे. तरुणांना शेअर बाजार, बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांना साडेचार कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर, मांजरी आणि कोंढवा भागातून हा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कदायक म्हणजे या फसवणूक झालेल्या तरुण मंडळींमध्ये एका व्यावसायिकाचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै ते सात ऑक्टोबर दरम्यान हा फसवणुकीचा सगळा प्रकार घडला. पुण्यातील हडपसरमधील ५२ वर्षीय व्यावसायिकाशी तीन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल व इ-मेलद्वारे संपर्क साधला. ‘शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळेल,’ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध बॅंक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले. फिर्यादीने तब्बल तीन कोटी ६६ लाख ४४ हजार रुपये सायबर चोरट्यांच्या खात्यात वर्ग केले. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणुकीचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Teacher Transfer : जिल्हा परिषदेची शाळा जगात पहिल्या नंबरला, तरीही वारे गुरुजींवर बदलीचं संकट

तसेच, हडपसरमधील मांजरी भागात राहणाऱ्या तरुणालाही अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. सुरुवातीला थोडाफार परतावा दिल्यानंतर त्याला सातत्याने अधिक पैसे गुंतविण्यास भाग पाडले. अखेरीस या तरुणाची ३४ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

Crime News : दुप्पट परताव्याच्या आमिषाला भुलली तरुणाई, सायबर चोरट्यांनी घातला कोट्यावधींचा गंडा; काय आहे नेमकं प्रकरण ?
Pakistan Attack News : लेफ्टनंट कर्नल, मेजरसह लष्काराच्या ११ जवानांचा मृत्यू; पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याने हादरला

याशिवाय, कोंढवा परिसरातील एका व्यक्तीला बिटकॉइन गुंतवणुकीचे आमिष दाखवून १२ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून ‘बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा, मोठा परतावा मिळेल,’ असे सांगून त्याच्या खात्यातून रक्कम वळवली. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी मोबाईल क्रमांक बंद केले. पुण्यातील हडपसर, मांजरी आणि कोंढवा भागात घडलेल्या सायबर फसवणुकीच्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या फसवणुकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या फसवणुकी विरोधात काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com