Crime x
क्राईम

Crime : गर्लफ्रेंडचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला, रागाच्या भरात बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्टच कापला

Crime News : एका मुलीने रागाच्या भरात तिच्या बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मुलीने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • प्रेमविवादातून एका मुलीने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला.

  • तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

  • तरुणाने मुलीचा अंघोळ करताना व्हिडीओ बनवला होता, ज्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला.

Shocking : प्रेमप्रकरणात झालेल्या वादानंतर एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंड धारदार शस्त्राने हल्ला केला. मुलीने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेनंतर तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील मल्लवन पोलीस स्टेशन परिसरात घडल्याचे म्हटले जात आहे.

जखमी तरुणाचे नाव जसवंत सिंह (वय २९ वर्ष) असे आहे. जसवंत हा राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हरदोई येथे आला होता. दोघांची हरिद्वार येथे ओळख झाली होती. तेथे काम करत असताना त्यांच्यात जवळीक वाढली. एका वर्षापूर्वी मुलीचे कुटुंब हरिद्वारहून हरदोई येथे आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला होता. यावरुन तो मुलीला त्रास देत होता, ब्लॅकमेल करत होता. या व्हिडीओवरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. जेव्हा तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी हरदोई येथे आला. तेव्हाही त्यांच्यात भांडण झाले. तेव्हा रागाच्या भरात मुलीने तरुणावर हल्ला केला.

अंघोळीच्या व्हिडीओवरुन सुरु झालेला वाद प्रचंड पेटला. रागात मुलीने धारदार शस्राने तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला. अचानक झालेल्या हल्ल्यात तरुण रक्तस्त्राव होत असल्याने खाली पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT