Pune News Saam Tv
क्राईम

Pune News: इन्स्टाग्रामवरील बनावट लव्ह स्टोरीने घेतला तरुणीचा जीव; मैत्रिणीच्या रुपातील वैरिणीला अटक

Instagram Fake Love Story: इन्स्टाग्रामवर खोटे अकाउंट उघडून प्रेमाचं खोटं नाटक करुन मैत्रिणीनेच चक्क मैत्रिणीचा जीव घेतला आहे.

Manasvi Choudhary

पुणे जिल्ह्यातील उत्तर कोरेगावात एक धक्कादायक घटना घडली. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तरुणाच्या नावाने तिने इन्स्टाग्रामवर बनावट खातं तयार केलं. इतकंच नाही तर, अनेक दिवस तिने आपल्या मैत्रिणीसोबत तरुणाच्या नावाने चॅटिंग देखील केली. जेव्हा मैत्रिणीने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा वडिलांच्या नावाने मॅसेज पाठवून त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचा खोटा बनाव रचला.

या घटनेनंतर तरुणी नैराश्यात गेली. इतके दिवस ज्याच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी केल्या. ज्याला न बघता जीवापाड प्रेम केलं तोच या जगात नाहीये, असं समजून तिने गळफास लावत आत्महत्या केली. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली तरुणाचं खोटं अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केलाय.

घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव परिसरात असलेल्या अल्ल्याड-पल्ल्याड या गावात राहणाऱ्या एका तरुणीने थट्टा मस्करीत इन्स्टाग्रामवर मनीष पाटील या नावाने बनावट अकाउंट तयार केले.या अकाउंटवरुन तिने आपल्या मैत्रिणीला मेसेज केले. तसेच तिला प्रेमाच्या जाळ्यात देखील ओढलं.

अनेक दिवसांच्या चॅटिंगनंतर या तरुणीने मनीषला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आता आपलं सर्व नाटक उघडं पडणार या भीतीने तरुणीने आणखी एक इन्स्टाग्राम अकाउंट ओपन केलं. त्यावरून मी मनीषचे वडील बोलतोय. नुकतेच निधन झाले असून तो या जगात नाहीये, असा मॅसेज केला.

मनीषच्या प्रेमात पडलेली ही मुलगी खूपच निराश झाली. एकदाही न भेटलेल्या या मुलीला मनीष आपल्याला सोडून गेला आहे. तो या जगात नाही. हे दु:ख सहनच झाले नाही. त्यामुळे या मुलीने तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद केला असून पोलिसांकडून आत्महत्येचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

पोलिसांनी आत्महत्या केलेल्या मुलीचा फोन चेक केल्यानंतर या मुलीचे मनीष पाटील आणि शिवम पाटील यांच्याशी केलेले इन्स्टाग्राम चॅट समोर आले आहेत. यानंतर पोलिसांनी मनीष आणि शिवम या व्यक्तींचा शोध घेतला असता हे बनावट अकाऊंट्स असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर हे दोन्ही अकाऊंट कोणाचे आहेत? हे तपासण्यासाठी पोलिसांना मोबाईल नंबर ट्रॅक केला तर हा नंबर तिच्या जिवलग मैत्रिणीचा होता. अशी माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी मैत्रिणीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT