Police investigation underway after a father was arrested for the brutal killing of his 4-year-old daughter in Faridabad. Saam Tv
क्राईम

५० पर्यंत अंक मोजता येईना, बापाचं डोकं सटकलंं, रागाच्या भरात लेकीला मार-मार मारलं अन्....

Father Killed Daughter For Studies In Faridabad: फरीदाबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० पर्यंत अंक मोजता येत नसल्याने वडिलांनी चार वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली.

Omkar Sonawane

फरीदाबादमधील झारसेंतली गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. चार वर्षांच्या मुलीला तिच्याच वडिलांनी मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. मुलीला ५० पर्यंत मोजता येत नसल्याने तिचे वडील संतापले आणि त्यांनी तिला बेदम मारहाण केली. या मुलीच्या आईने पोलीस स्थानकात धाव घेत वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ त्या नराधम बापाला अटक केली आहे.

फरीदाबाद सेक्टर ५८ पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी आझाद सिंह यांनी सांगितले की, सोनभद्रमधील खरंतिया गावातील रहिवासी कृष्णा आणि त्यांची पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून फरीदाबादमधील झारसेंतली गावात भाड्याने राहत आहेत. दोघेही एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांना तीन मुले आहेत. ७ वर्षांचा मुलगा, ४ वर्षांची मुलगी जिचे निधन झाले आहे आणि अजून एक २ वर्षांची मुलगी आहे. पती नाईट ड्यूटी करतो, तर पत्नी दिवसा काम करते.

मुलांची काळजी घेण्यासाठी कृष्णा दिवसा घरी होता. २१ जानेवारी रोजी कृष्णा त्याच्या चार वर्षांच्या मुलीला शिकवत होता. त्याने तिला ५० पर्यंत मोजण्यास सांगितले, पण जेव्हा ती मोजू शकली नाही, तेव्हा तो संतापला आणि तिला बेदम मारहाण करू लागला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी कृष्णाने त्याच्या पत्नीला सांगितले की त्याची मुलगी खेळताना पायऱ्यांवरून पडली आहे. त्यानंतर कृष्णाने तिला सरकारी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर कृष्णाने त्याच्या पत्नीला फोन करून सांगितले की मुलगी खेळताना पायऱ्यांवरून पडली होती, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या शरीरावर खुणा पाहून त्याच्या पत्नीला संशय आला आणि तिने पोलिसांना ही बाब कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला. या क्रूर बापाला पोलिसांनी खाकीचा चांगलाच रंग दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याची मुलगी शाळेत जात नव्हती, म्हणून तो तिला घरी शिकवत असे. तिला अंक लिहिता येत नसल्याने रागावून त्याने तिला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला रिमांडवर घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ये गारेगार....हार्बर रेल्वेवर १४ एसी लोकल; पनवेल ते मुंबई प्रवास सुखकर, जाणून घ्या वेळापत्रक

Ratnagiri Tourism : मन उधाण वार्‍याचे...; कोकणाच्या मातीत लपलाय 'हा' किनारा, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

Zilla Parishad Election: राज्यात भाजपचा धमाका! ZP निवडणुकीआधीच उडवला विजयाचा बार, कोकणात १० जण बिनविरोध, विरोधकांना मोठा धक्का

Maharashtra Live News Update: चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेत एक नवा ट्विस्ट

Dog Attack: कुत्र्यांची टोळी अंगावर धावली तर काय कराल? दुचाकी चालकांनी ही माहिती वाचाच

SCROLL FOR NEXT