Jaipur Wedding: बापाची वेडी माया! मुलीच्या लग्नाची पत्रिका ३ किलो चांदीची, २५ लाखांचे कार्ड पाहून डोळे विस्फारतील

Jaipur Father Make 25 Lakh Wedding Card for Daughter Wedding: जयपुरमधील एका लग्नसोहळ्यासाठी तब्बल २५ लाखांची पत्रिका तयार करण्यात आली आहे. या पत्रिकेत ३ किलो चांदी वापरण्यात आली आहे.
Jaipur Wedding
Jaipur WeddingSaam Tv
Published On

मुलीचे लग्न हे प्रत्येक आईवडिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. लेकीच्या लग्नासाठी बाप आपल्या आयुष्यभराची पुंजी वापरतो. तिच्या लग्नासाठी खूप स्वप्न पाहिलेली असतात. लेकीच्या लग्नात हौस करतात. दरम्यान, एका वडिलांनी आपल्या लेकीसाठी २५ लाखांची लग्नपत्रिका छापली आहे.

Jaipur Wedding
Gold Rate Today : दररोज नवे विक्रम, आजही सोन्यात मोठी वाढ, वाचा 24k, 22k गोल्डचे रेट

राजस्थानमधील जयपुरमधील एका शाही सोहळ्यासाठी तब्बल २५ लाखांची पत्रिका छापण्यात आली आहे. या पत्रिकेला तयार करण्यासाठी ३ किलो चांदी वापरण्यात आली आहे. मुलीच्या लग्नात ३ किलोची चांदी वापरुन कार्ड तयार केले आहे.

ही लग्नपत्रिका खूप सुंदर तयार केली आहे. यासाठी बनवलेले बॉक्सदेखील चांगलेच चर्चेत आहेत. या पत्रिकेचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जयपूरचे रहिवासी शिव जोहरी यांनी आपल्या लेकीसाठी हे कास गिफ्ट केले आहे. ३ किलो चांदीची ही लग्नपत्रिका बनवण्यासाठी १ वर्षाचा वेळ लागला आहे.

लग्नपत्रिकेची खासियत

शिव जोहरी यांनी आपली मुलगी श्रृती जोहरीच्या लग्नासाठी ही खास पत्रिका तयार केली आहे. ही पत्रिका ८ x ६.५ इंच आहे. पुत्रिकेची रुंदी ३ इंच आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी १ वर्ष लागले. या पुत्रिकेत १२८ वेगवेगळे तुकडे लावण्यात आले आहे. या कार्डावर गणपती बाप्पा, राम दरबार, शिव पार्वती आणि लक्ष्मी नारायण यांच्यासह ६५ देवतांच्या प्रतिमा आहेत. या सर्व प्रतिमा हाताने कोरलेल्या आहेत. हे कार्ड बनवण्यासाठी कोणत्याही खिळ्याचा किंवा स्क्रूचा वापर केलेला नाही. हाताने या सर्व गोष्टी तयार केल्या आहेत.

Jaipur Wedding
Kalyan Crime News: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

राजस्थानमधील हे लग्न खूप दिमाखदार पद्धतीने पार पडले. आपल्या लेकीसाठी वडिलांनी खूप स्वप्न रंगवली होती. लेकीची हौस पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही चांदीची लग्नपत्रिका तयार केली आहे. यातून बापाचं लेकीवरचं प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ही लग्नपत्रिका त्यांच्या या सर्वात महत्त्वाच्या दिवसाची आठवण म्हणून कायम त्यांच्यासोबत राहणार आहे.

Jaipur Wedding
Viral Video : केस ओढले, ओरबाडले , नामंकित मसाज कंपनीच्या थेरपिस्टचा धक्कादायक प्रकार; Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com