वडाळा मसाज सेवेदरम्यान महिलेला मारहाण
बुकिंग रद्द केल्याने थेरपिस्टचा संताप अनावर
महिलेच्या मुलावरही हल्ला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलिसांत गुन्हा दाखल, कंपनीकडून थेरपिस्टवर कारवाई
Mumbai Wadala Urban Company Viral Video घरपोच सेवा मिळणं कोणाला नाही आवडत. पार्लर, मसाज सारख्या सेवा घरच्या घरी मिळणं महिला वर्गासाठी वेळ वाचवणाऱ्या आणि आरामदायी ठरतात. मात्र या सुविधा कधी कधी जीवघेण्यादेखील ठरू शकतात. अशीच एक घटना मुंबईतील वडाळा येथून समोर आली आहे. एका महिलेने मसाज साठी नामंकित कंपनीत बुकिंग केलं होत. त्यानुसार मसाज करणारी एक तरुणी महिलेच्या घरी पोचली मात्र महिलेने बुकिंग रद्द केली. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने महिलेवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शहनाज वाहीद सय्यद (४६) या भक्ती पार्क, वडाळा पूर्व येथील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, अर्बन कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन मसाज सेशन बुक केले होते. त्यानुसार २१ जानेवारी रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास कंपनीत स्पा थेरपिस्ट म्हणून काम करणारी अश्विनी शिवशनाप्पा वर्तपी (३२) ही सेवा देण्यासाठी त्यांच्या घरी आली. तथापि, थेरपिस्टने आणलेला मसाज बेड फ्लॅटमध्ये बसू शकला नाही, त्यामुळे शहनाजने बुकिंग रद्द केले आणि मालिश करणाऱ्याला निघून जाण्याची विनंती केली.
यामुळे थेरपिस्ट अश्विनी संतापली तिने शहनाज यांच्याशी जोरदार वाद घातला आणि शहनाज यांच्यावर हल्ला केला, त्यांचे केस ओढले, ओरबाडले आणि मुक्का मारला. तक्रारदार शहनाज यांच्या मुलाने या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावरही हल्ला करण्यात आला.दरम्यान शहनाज यांच्या मुलाने ही घटना त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, अर्बन कंपनीने सांगितले की, घटनेनंतर त्यांनी थेरपिस्ट अश्विनी शिवशनाप्पा वर्तपी हिला कामावरून काढून टाकले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.