Kalyan Crime News: शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना|Video Viral

Attack On Shiv Sena Leader: कल्याणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर दिवसाढवळ्या शस्त्रांनी हल्ला झालाय. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Attack On Shiv Sena Leader In Kalyan
Shiv Sena office bearer Shakti Rai injured after a daylight armed attack in Kalyan; CCTV and mobile video clips go viral on social media.saam tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात हल्ला

  • चार ते पाच जणांनी शस्त्रांचा वापर करून केला हल्ला

  • हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज/कल्याण

कल्याण शहरात गुंडगिरी वाढू लागली असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाहीये. आज सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी शक्ती राय यांच्यावर चार ते पाच जणांनी शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या हल्ल्याच्या घटना घडत असल्यानं शहरात दहशतीचं वातावरण आहे. दरम्यान या हल्ल्यात शक्ती राय यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Attack On Shiv Sena Leader In Kalyan
Crime: गळा दाबून गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ७ दिवस घरात जाळले, निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शक्ती राय यांची एक सेक्युरिटी एजन्सी आहे. संबंधित एजन्सीचा टेंडर संपल्यानंतरही दोन कर्मचाऱ्यांचा थकीत पगाराचा वाद सुरू होता. याच वादातून संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारांसह मिळून शक्ती राय यांच्यावर हल्ला केला असा आरोप केला जातोय.

Attack On Shiv Sena Leader In Kalyan
Crime News: महिलेसोबत डीजीपी ऑफिसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत दिसले, व्हिडिओ व्हायरल, नंतर आयपीएसकडून मोठा खुलासा अन्...; प्रकरण काय?

घटना घडताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ दखल घेत चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे तपास केला जातोय. या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून पुढील तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

भिवंडीत भाजपच्या आमदार अन् माजी महापौरात राडा

भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौघुले व कोणार्क आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची घटना चार ते ५ दिवसापूर्वी घडली होती. निवडणुकीत भाजप आमदाराच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही पती पत्नी जखमी झाले आहेत. माजी महापौर आणि आमदाराचा मुलाने भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यांचा पराभव महापौर यांच्या मुलाने केला होता. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com