Crime News: महिलेसोबत डीजीपी ऑफिसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत दिसले, व्हिडिओ व्हायरल, नंतर आयपीएसकडून मोठा खुलासा अन्...; प्रकरण काय?

Crime News: सोशल मीडियावर डीजीपी रँकच्या IPS अधिकाऱ्याचा ऑफिसमधील आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ खोटा व मॉर्फ असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
IPS in offensive position with woman in the office Video viral on social media
IPS in offensive position with woman in the office Video viral on social mediaSaam Tv
Published On

Crime News: सोशल मीडियावर कर्नाटकचे एक डीजीपी रँकचे वरिष्ठ IPS अधिकारी डॉ. रामचंद्र राव आणि एका महिलेचा ऑफिसमधील आक्षेपार्ह व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामुळे प्रशासनासह आणि जनमानसात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अधिकारी सरकारी वर्दीत असून आपल्या कार्यालयात एक महिला सोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत.

पण, डॉ. रामचंद्र राव यांनी स्वतः स्पष्ट केलंय की हा व्हिडीओ पूर्णपणे 'मॉर्फ' आहे. AI किंवा व्हिडीओ एडिटिंगद्वारे बनवण्यात आलेला आहे आणि हे त्यांच्या प्रतिमेविरुद्ध एक कट आहे. त्यांनी व्हायरल क्लिप खोटा असल्याचा दावा केला असून सत्यतपासाणीची मागणी केली आहे.

IPS in offensive position with woman in the office Video viral on social media
Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामूहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

घटनेवर प्रशासन आणि मुख्यमंत्री सिद्धारमैयांनीही लक्ष केंद्रीत केलं आहे आणि व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस खात्यावरील विश्वास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नैतिकतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या बाजूने सत्य परिस्थिती शोधण्यासाठी तातडीने तपास सुरू आहे.

IPS in offensive position with woman in the office Video viral on social media
Crime News: ५०० रुपयांसाठी मैत्री विसरला; मित्राला क्रूरपणे संपवलं, तरुणानं मृतदेह घरी पोहोचवला, नंतर...

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अधिकारी महिलेल्या कंबरेत हात घालून तिला स्वत: जवळ करत आहे. अधिकारी पोलिस गणवेशात असल्यामुळे या व्हीडिओबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या या प्रकरणावर खूप संतापले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com