गर्लफ्रेंडच्या घरात घुसला, इतक्यात शेजारीण आली, बॉयफ्रेंड ४५ मिनिटं लोखंडी पेटीत लपला; पण संशय आला अन्...

Kanpur Village Girlfriend Hides Lover In Iron Trunk: कानपूरच्या चकेरी भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला लोखंडी पेटीत 45 मिनिटे बंद करण्यात आले. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Police and locals gather as a man is rescued from an iron box in Kanpur village.
Police and locals gather as a man is rescued from an iron box in Kanpur village.Saam Tv
Published On

उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. लोकांनी यावर मजेशीर कमेंट देत मोठ्या प्रमाणात याला शेअर केले आहे. कानपूर येथील चकेरी या भागात एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला. याच दरम्यान शेजारची काकी देखील त्या मुलीच्या घरी पोहोचते आणि तिला दरवाजा उघडायला लावते. यावेळी प्रेयसीने घाबरून त्याला एका लोखंडी पेटीत बंद करते.

काकीला या बंद पेटीतून आवाज येत असतो. त्यामुळे ती पोलिसांना फोन लावून बोलवते आणि सगळा किस्साच उघडीकस येतो. जवळपास 45 मिनिटे ही बॅग बंद असल्याने प्रियकराला श्वास घ्यायला त्रास होतो. ही घटना शुक्रवारची सांगितली जात आहे. या तरुणीचा मोठा भाऊ ट्रॅक्टर घेऊन बाहेर गेलेला असतो आणि आई कामावर गेलेली असते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिने आपल्याला प्रियकराला फोन करून घरी बोलावले आणि काही वेळातच शेजारी राहणारी काकी तरुणीच्या घराचे दार वाजवते.

Police and locals gather as a man is rescued from an iron box in Kanpur village.
Domestic dispute : संतापलेल्या नवऱ्याने धाडधाड गोळ्या झाडल्या, बायकोसह चौघांचा जागीच मृत्यू, नेमकं कारण काय ?

काकीने लगेचच आई आणि भावाला फोन केला

काकीने बाहेरूनच त्या तरुणाचा आवाज ऐकला होता. त्यामुळे ती दरवाजा ठोकू लागली. पण त्या मुलीने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे काकीने लगेचच मुलीच्या आईला आणि भावाला फोन करून बोलावून घेतले आणि पोलिसांना देखील सांगितले. काही वेळात तरुणीचा भाऊ घरी येतो.

Police and locals gather as a man is rescued from an iron box in Kanpur village.
Bigg Boss Marathi 6 : "मस्तीत नाही शिस्तीत राहायचं..."; अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ, कठोर शब्दात केली कानउघडणी-VIDEO

खूप वेळानंतर तरुणीने उघडला दरवाजा

पोलिसांसमोरच तिच्या भावाने जोरजोरात दरवाजा वाजवत आवाज देऊ लागला. तेव्हा कुठे तरुणीने दरवाजा उघडला. त्यावेळी सगळ्यांनी तिला घरात कोणी अजून आहेका असे विचारले असता तिने नकार दिला. यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्या हाती काहीच आले नाही. तो पर्यंत प्रेयसीला पेटीत बंद करून 45 मिनिटे झाली होती.

तरुणी पेटीची चावी न देण्यावर ठाम

पेटीच्या आतमध्ये हा तरुण तडफडू लागला. त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. तो जोरजोरात गागायला लागला. तरी देखील ती चावी देत नव्हती. बऱ्याचवेळा मागून अखेर तिने चावी दिली. पेटी उघडल्यानंतर तिचा प्रेयसी बाहेर आला मोकळा श्वास घेण्यासाठी धडपडू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com