Pune Fake IPS Officer Saam Tv
क्राईम

Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

Pune Fake IPS Officer : पुण्यात बनावट आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मायलेकींनी व्यावसायिकाचा १७ हजार रुपयांचा माल लंपास केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या दोघींना कोंढवा भागातून अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात बनावट आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मायलेकींनी व्यावसायिकाची फसवणूक केली.

  • या मायलेकींनी चप्पल विक्रेत्याला १७ हजार रुपयांचा गंडा घातला.

  • पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मायलेकींना जेरबंद केले आहे.

  • या बनावट आयपीएस मायलेकींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे तिथे काय उणे? याचं पुण्यात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. आय पी एस मायलेकींनी एका चप्पल विक्रेत्याला हजारोंचा गंडा घातला आहे. धक्कदायक म्हणजे या दोघीही बनावट आय पी एस अधिकारी असल्याचं उघड झालं आहे. दागिने खरेदीच्या बहाण्याने बनावट आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून चप्पल-बूट व दागिने लंपास करणाऱ्या या मायलेकींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर पोलिस ठाण्यात एका चप्पल चे व्यावसायिक असलेल्या व्यक्तीने फिर्याद दिली होती. पुण्यातील महात्मा गांधी रोड परिसरात या व्यावसायिकाचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी २ महिला या तक्रारदार व्यावसायिकाच्या दुकानात आल्या.

या महिलांनी आपण आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर लग्नाचा कार्यक्रम असल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर चप्पल व बूट खरेदी करायला आलो असल्याचे सांगितले आणि संबंधित दुकानातील कामगाराला ‘पैसे घेण्यासाठी कमिशनर ऑफिसला चल’ असा रुबाब केला.

रुबाबात आलेल्या या मायलेकी मात्र, पैसे न देता तब्बल १७ हजारांचा माल घेऊन दोघी पसार झाल्या. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या माय लेकींचा शोध घेतला. मूळच्या पुण्यातील कोंढवा भागातील असलेल्या या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या दोघींना काय शिक्षा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT