Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

Mumbai News : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने तब्बल सहा बोगदे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ, इंधन वाचणार असून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होणार आहे.
Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन
Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सहा बोगद्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

  • मोरगाव-मुलुंड लिंक रोड आणि किनारी रस्त्याशी जोडले जाणार बोगदे करण्यात येणार आहे.

  • ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगद्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

  • १३५४ कोटींचे आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर उपाय म्हणून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने सहा बोगदे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढती वाहतूक कोंडी बोगद्यामार्गे वळविली, तर वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता आहे.

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मात्र ही समस्या अधिकाधिक वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांना परस्परांशी जोडणारे तब्बल सहा बोगदे उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढवणे आणि भुयारी मार्गांचा विकास करणे, हा या संपूर्ण प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन
Maharashtra Politics : औरंगजेब देशाचे बादशाह, आंबेडकरांसमोर वंचितच्या नेत्याकडून वक्तव्य, नेमकं काय म्हणाले माजी आमदार?

या प्रकल्पाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया केल्याची माहिती पालिकेने दिली. मोरगाव-मुलुंड लिंक रोड आणि मुंबई किनारी रस्ता यांच्याशी प्रस्तावित सर्व बोगदे जोडले जाणार आहेत. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुरळीत होऊन प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

Mumbai Traffic : मुंबईकरांचा प्रवास आता सुखकर होणार! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन
Dombivli Investment Scam : आकर्षक परताव्याचं आमिष दाखवलं, गुंतवणूकदारांना लुबाडलं, कोट्यवधी रुपयांची फसवणूक

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दुहेरी बोगद्याचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एकूण १३५४.६६ कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मंजूर केले आहे. यामध्ये केंद्रीय करासाठी ३०७.२२ कोटी, राज्यस्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी, तर जमीन अधिग्रहण आणि इतर खर्चासाठी ४३३ कोटींचा समावेश आहे. दरम्यान महापालिकेच्या या निर्णयाने वाहतूक कोंडी फुटणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com