Karnataka Crime  Saam Tv
क्राईम

Crime: विवाहबाह्य संबंधाचा भयंकर शेवट, ३० वर्षीय बॉयफ्रेंडकडून महिलेची हत्या; मृतदेह जाळून टाकला

Married Women Killed In karnataka: कर्नाटकमध्ये विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. बॉयफ्रेंडने डोक्यात विटेने हल्ला करत हत्या केली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More
  • कर्नाटकमध्ये ४३ वर्षीय विवाहित महिलेची हत्या

  • आरोपी ३० वर्षीय बॉयफ्रेंडचे भयंकर कृत्य

  • महिलेच्या डोक्यावर विटेने हल्ला करत जागीच संपवलं

  • पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून जाळून टाकला

कर्नाटकमध्ये महिलेची हत्या करून मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. निर्माणाधीन इमारतीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना देखील अवघ्या ३६ तासांत आरोपीला अटक केली. आरोपी महिलेचा बॉयफ्रेंड आहे. या घटनेमुळे कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी शहरात ही घटना घडली. ४३ वर्षीय महिलेची हत्या करुन आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून जाळून टाकला. ही घटना ८ जूनच्या रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास घडली. पोलिस तपासातून समोर आले की, हत्या करण्यात आलेली महिला कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील करातगी गावात राहणारी होती. ती महिला विवाहित होती तिचे कुश्तागी तालुक्यात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते.

घटनेच्या रात्री आरोपी तरुण महिलेला फूस लावून निर्माणाधीन घरात घेऊन गेला. त्याठिकाणी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संतप्त झालेल्या तरुणाने महिलेच्या डोक्यावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. आरोपीने महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून दिला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

संगनगौडा मालिपाटील नावाच्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून कनकगिरी पोलिसांनी या प्रकरणी हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्ष तपास करत पोलिसांनी फक्त महिलेची ओळख पटवली नाही तर आरोपीलाही अटक केली. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT