haryana Crime News Saam tv
क्राईम

Haryana Crime : माजी सैनिकाचं हादरवणारं कृत्य, ६ महिन्याच्या बाळासहित कुटुंबातील ५ जणांना संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

IAF Sergeant killed family members : हरियाणात माजी सैनिकाने हादरवणारं कृत्य केलं आहे. या माजी सैनिकाने ६ महिन्याच्या बाळासहित कुटुंबातील ५ जणांना संपवलं आहे. या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Vishal Gangurde

हरियाणा : हरियाणाच्या अंबालामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सैन्य दलाच्या निवृत्त सैनिकाने हादरवणारं कृत्य केलं आहे. या माजी सैनिकाने एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली आहे. या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने अंबाला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी सैनिकाने रविवारी कुटुंबातील सदस्यांची हत्या केली. त्याने ६५ वर्षीय आई सरोपी देवी, ३५ वर्षीय भाऊ हरिश कुमार, ३२ वर्षीय हरिशची पत्नी सोनिया, ५ वर्षीय मुलगी यशिका, ६ महिन्याचा मुलगा मयांक अशी या मृतांची ओळख पटली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचं नाव भूषण कुमार आहे. त्याने रात्री उशिरा भावावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर एक-एक करून संपूर्ण कुटुंबाला संपवलं. त्याने मृतदेहांना जाळण्याचाही प्रयत्न केला. भूषणने वडील आणि भाऊ हरीशच्या मोठ्या मुलीवरही हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक दृष्ट्या जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. नारायणगडच्या रतौर येथे एका जमीन आहे. त्या जमिनीवर दोन्ही भावांनी दावा केला होता. यावरून वाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनेचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

दरम्यान, एकाच कुटुंबातील पाच जणांच्या हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर या हल्ल्यात बचावलेल्या कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पाच जणांच्या हत्येने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाथर्डी मध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

Malti Chahar: बापाच्या वयाच्या डायरेक्टरने किस केला, मालती चहरचा धक्कादायक आरोप; बिग बॉस फेमसोबत नेमकं काय घडलं?

फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

SCROLL FOR NEXT