Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam Digital

Nashik Crime News: धक्कादायक! नाशिकमधील दरोड्यात ३ निवृत्त सैनिक सामील, कुरियर व्हॅनवर टाकला होता ८ जणांनी दरोडा

Nashik Crime News: नाशिकच्या घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंढेगाव शिवारात कुरियर व्हॅनवर दरोडा टाकून ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवला होता. या दरोड्याचा छडा पोलिसांनी ७ दिवसात लावला असून ५ जणांना अटक केली आहे.
Published on

Nashik Crime News

नाशिकच्या घोटी पोलीस ठाणे हद्दीतील मुंढेगाव शिवारात कुरियर व्हॅनवर दरोडा टाकून ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पळवला होता. या दरोड्याचा छडा पोलिसांनी ७ दिवसात लावला असून ५ जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे एकूण ८ संशयितापैकी ३ सेवानिवृ्त्त सैनिक आहेत, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ संशयितांनी कुरियर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत लोखंडी रॉडचा धाक दाखवून साडेचार किलो सोन्याचे दागिने व बिस्किटे, १३५ किलो चांदीचे दागिने व विटा, मोबाईल फोन असा एकूण ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्यानंतर स्थानिक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने प्रत्यक्षदर्शीने केलेल्या आरोपींचे वर्णन, बोलीभाषा, भौतिक पुरावे, तांत्रिक विश्लेषण यानुसार तपास केला. त्यानुसार हे गुन्हेगार आग्रा येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Crime News
Amravati Crime News : दुचाकी चाेरीसाठी मास्टर चाव्यांचा वापर, 29 बाईकसह एकास अटक; सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई

पोलिसांनी आग्रा येथे जाऊन पाच संशयितांना अटक केले. तसेच त्यांनी आणखी तीन संशयितांची नावे सांगितली. यातील अटक केलेला आरोपी आकाश परमार याला संबंधित कंपनीचे कुरियर कुठल्या शहरात जाता, याबाबत सखोल माहिती होती. त्यानुसार ही दरोड्याची योजना टाकण्यात आली. यात अटक केलेल्या पाच आरोपींच्या ताब्यातून २.५ किलो सोन्याचे दागिने, ४५ किलो चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या आरोपींना न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यात धक्कादायक बाब म्हणजे ८ संशयितांमध्ये ३ जण हे सेवानिवृत्त सैनिक आहे.

Nashik Crime News
Kalyan Crime: पाळत ठेवून रेल्वे स्थानकावर चोरायचे प्रवाशांच्या बॅग, पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com