Kalyan News Saam Tv
क्राईम

Kalyan Crime News : ५० रुपये द्यायला नकार दिला, भरदिवसा नशेखोर तरुणाकडून दुकानदारावर चाकूहल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Kalyan News : कल्याणमध्ये ५० रुपयांच्या खंडणीसाठी नशेखोराने दुकानदारावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. पोलिस चौकीच्या जवळच ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Alisha Khedekar

कल्याणमध्ये फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी नशेखोराचा दुकानदारावर चाकूने हल्ला

पोलिस चौकीजवळच घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून एमपीडीए अंतर्गत तुरुंगवास भोगलेला आहे

या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

कल्याणमधून धक्कदायक घटना समोर आली आहे. फक्त ५० रुपयांच्या खंडणीसाठी एका नशेखोराने स्थानिक दुकानदारावर भरदिवसा चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. सदर घटना कल्याण मधील बिर्ला कॉलेज रोडवर घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज रोड परिसरात गुरुवारी एका नशेखोर व्यक्तीने ५० रुपयांसाठी स्थानिक दुकानदारांसोबत वाद केला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी दुकानदाराला धमकावून मारहाण केली. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने दुकानदारावर धारदार चाकूने हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की दुकानदार गंभीररीत्या जखमी झाला आहे.

हल्लेखोर हा सराईत गुन्हेगार असून तो याआधी एमपीडीए अंतर्गत दीड वर्ष तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो सुटून बाहेर आला आणि पुन्हा गुन्हेगारी मार्गावर सक्रिय झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना पोलिस चौकीच्या अगदी हाकेच्या अंतरावर घडली असून, त्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जखमी दुकादाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून सुदैवाने दुकानदाराने प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचा जीव बचावला . संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित सहा आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

परिसरातील व्यापाऱ्यांनी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. हल्ल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान सर्वसामन्य नागरिक सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

IIT च्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेच्या आदल्या दिवशी ९ व्या मजल्यावरून मारली उडी

Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वत:ला लावली आग, धक्कादायक VIDEO समोर, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! लैंगिक अत्याचार प्रकरणात महाराष्ट्रात नवा कायदा; नसरापूर प्रकरणानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर

Maharashtra Hill Stations: महाराष्ट्रातील ७ थंड हवेची ठिकाणं, महाबळेश्वर-लोणावळा विसराल; उन्हाळ्याच्या सुट्टीत फॅमिलीसह भेट द्या

SCROLL FOR NEXT