dombivali ramnagar police arrests auto rickshaw driver along with three minor saam tv
क्राईम

Dombivali Crime News : महिलेस लुटणा-या रिक्षाचालकाला अवघ्या सहा तासात अटक, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई

डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारी (ता. 22 मार्च) डोंबिवली घारडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने महिला जात हाेती.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan Dombivali :

फुले आणण्यासाठी निघालेल्या हारविक्रेत्या महिला प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने तीचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तक्रार दाखल होतच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या सहा तासात महिलेला लुटणारा रिक्षा चालक अनिल खिल्लारे यांना बेड्या ठोकल्या. अनिल सोबत त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.  (Maharashtra News)

डोंबिवली पूर्वेकडील आजदे गावात राहणारी तक्रादार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारी (ता. 22 मार्च) डोंबिवली घारडा सर्कल येथून कल्याण एपीएमसी मार्केटच्या दिशेने महिला जात हाेती. घारडा सर्कल येथे ती एका रिक्षात बसली. या रिक्षात रिक्षा चालकासह आणखी तिघेजण बसले होते.

या रिक्षाचालकाने न्यू गोविंदवाडी बीएसयूपी इमारती जवळ निर्जनस्थळी रिक्षा थांबवली. रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली .याचवेळी मागे बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. या घटनेनंतर महिलेने डोंबिवली रामनगर पोलिस गाठले. तिने घटनेबाबत पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत तपास सुरु केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर पाेलिसांनी अवघ्या सहा तासात हा गुन्हा उघडकीस आणला. डोंबिवली राम नगर पोलिसांच्या पथकाने महिलेला लुटणाऱ्या रिक्षा चालक अनिल खिल्लारे याला बेड्या ठोकल्या. त्याच्या तीन अल्पावयीन साथीदारांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : धक्कादायक.. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आढळली तीन महिन्यांच्या चिमुकली

People born in December: अत्यंत भाग्यशाली असतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोकं, स्वभावातला 'हा' गुण तुम्ही देखील अनुभवला असेल

Maharashtra News Live Updates: मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर पोहोचले

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री, कशी असते प्रक्रिया? घ्या जाणून

Traveling skincare : हिवाळ्यात लाँग ट्रिप प्लान करताय? त्वचेची घ्या 'अशी' काळजी, दीर्घकाळ चेहरा राहील हायड्रेट अन् करेल ग्लो

SCROLL FOR NEXT