dhule police charged two along with vehicle transporting illegal activities Saam TV
क्राईम

Dhule Crime News : अफूची पुष्पा स्टाईल वाहतूक, दोघांना अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.

भूषण अहिरे

Dhule :

शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधीत अफूची वाहतूक रोखत मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता. पाेलिसांना संशय येऊ नये यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते. पाेलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वाहन तपासले असता चालक व वाहकाचे मनसुबे उधळले गेले. (Maharashtra News)

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते.

पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले. संबंधित वाहन थांबवून त्याची तपासणी केल्यानंतर विशेष कप्प्यात पाच लाख 76 हजार रुपये किंमतीची 72 किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे, व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: औषधांशिवायही टाळू शकता हार्ट अटॅकचा धोका; 4 सोप्या टीप्सचा करा वापर

Motorola Edge 70 भारतात लॉन्च; 50 MP कॅमेऱ्यासह दमदार फीचर्स, वाचा संपूर्ण वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: ठाकरे बंधु एकत्र आले तरी मुंबईकर आमच्या सोबत येतील, आम्हाला फरक पडणार नाही- देवेंद्र फडणवीस

Maharashtra Mahanagarpalika Elections : कार्यकर्त्यांनो लागा कामाला! २९ महापालिकांचा निवडणूक निकाल १६ जानेवारीला, वाचा संपूर्ण वेळापत्रक

What Is Model Code Of Conduct: निवडणूक आचार संहिता लागल्यानंतर काय करावे आणि काय करू नये?

SCROLL FOR NEXT