Dhule Crime News  Saam TV
क्राईम

Dhule Crime: बंदुकीचा धाक दाखवून धुळ्यातील व्यापाऱ्यांना लुटले, ३ लाख लंपास; लळींग घाटातील धक्कादायक घटना

Crime News: मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग घाटामध्ये धुळे शहरातील दोघा व्यापाऱ्यांची अज्ञात पाच लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवत, पैशांची लूट केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Gangappa Pujari

भूषण अहिरे, धुळे|ता. १८ जानेवारी २०२४

Dhule Crime News:

मुंबई आग्रा महामार्गावरील लळींग घाटामध्ये धुळे शहरातील दोघा व्यापाऱ्यांची अज्ञात पाच लुटारुंनी बंदुकीचा धाक दाखवत, पैशांची लूट केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच या दोघा व्यापाऱ्यांना लुटारूंनी मारहाण देखील केल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुळे शहरातील (Dhule) दोन भंगार व्यापारी मालेगाव येथून व्यापाराचे पैसे वसुली करून रात्री उशिरा धुळ्याच्या दिशेने परतत होते. यावेळी मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) लळींग घाटात या दोघा व्यापाऱ्यांना दोन दुचाकी वरून आलेल्या पाच लुटारूंनी अडवले. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जबर मारहाण केली.

यावेळी लुटारुंनी व्यापाऱ्यांकडे असलेल्या बॅगेतील जवळपास अंदाजे तीन लाख रुपये लुटून घटनास्थळावरून पोबारा केला केला. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघा व्यापाऱ्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यवतमाळ (Yavatmal) शहरात घरपोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या मुस्क्या आवळण्यात शेर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला यश आले आहे. सोमू वाने आणि हर्षल डोये असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या अटक केलेल्या आरोपींकडून नऊ लाख 48 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही पोलिसांचे निलंबन करा- देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

Amravati : मनोरंजनाचा परवाना घेत भरवला जुगार अड्डा; पोलिसांची धाड टाकत कारवाई, १५ नागरिक ताब्यात

SCROLL FOR NEXT