Dhule News : रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

Dhule News : मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या सेंधवा येथून शिरपूरकडे रुग्णवाहिकेतून काही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या हेतूने अमानुषपणे कोंबून नेली जात होती
Dhule Shirpur News
Dhule Shirpur NewsSaam tv
Published On

धुळे : कोणाला संशय येऊ नये या उद्देशाने रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी केली जात होती. (Shirpur) शिरपूर तालुका पोलिसांनी ॲम्बुलन्समधून गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करत (Dhule) तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Dhule Shirpur News
Navi Mumbai Crime: प्रेयसीची हत्या करत स्वतः केली आत्महत्या ; सांकेतिक क्रमांक लिहत रचलेल्या कटाचा पोलीस तपासात उलगडा

मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेल्या सेंधवा येथून शिरपूरकडे रुग्णवाहिकेतून काही गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या हेतूने अमानुषपणे कोंबून नेली जात होती. याबाबतची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून शिरपूर तालुका पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिसांनी (Shirpur Police) सापळा रचला असता हाडाखेड चेक पोस्ट या ठिकाणी रुग्णवाहिकेची तपासणी केली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Shirpur News
Dhangar Reservation : २६ जानेवारीपर्यंत सरकारने ठोस पावलं उचलावी अन्यथा रस्त्यावर उतरेल; धनगर बांधवांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक

दहा जनावरे कोंबलेली 

पोलिसांनी तपासणी केली असता रुग्णवाहिकेत जवळपास दहा गोवंश जातीची जनावरे अमानुषपणे बांधून व कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले. या संदर्भात दोन जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, या कारवाईदरम्यान दहा गोवंश जातीच्या जनावरांची मुक्तता करत पोलिसांनी या गाईंना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे तपासणी करून गोशाळेत त्यांची रवानगी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com