Navi Mumbai Crime: प्रेयसीची हत्या करत स्वतः केली आत्महत्या ; सांकेतिक क्रमांक लिहत रचलेल्या कटाचा पोलीस तपासात उलगडा

Navi Mumbai : मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होते. याचवेळी वैभवच्या मनात संशयाने घर केले आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचा कट
Navi Mumbai Crime
Navi Mumbai CrimeSaam tv
Published On

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळ वास्तव्यास असलेल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या (Navi Mumbai) केली. यानंतर स्वतः देखील रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तीन महिन्यापूर्वी घडली होती. पोलीस (Police) तपासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  (Maharashtra News)

Navi Mumbai Crime
Red Chilli Market : तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर मिरची खरेदीला सुरुवात; नंदुरबार बाजार समितीत ४०० वाहनातून आवक

नवी मुंबईच्या कळंबोली परिसरातील वैष्णवी बाबर (वय १९) आणि वैभव बुरुंगले (वय २४) यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद होत होते. याचवेळी वैभवच्या मनात संशयाने घर केले आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचा कट रचला. (Crime News) वैष्णवीची हत्या करणार, कुठे करणार, कशी करणार या सर्व बाबी वैभवने आधीच सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे वैभवने वैष्णवीला खारघर हिलवर घेऊन जाऊन गळा आवळून हत्या केली. यानंतर स्वतः देखील जुईनगर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navi Mumbai Crime
Bullock Cart Race : बैलगाडी स्पर्धेदरम्यान बैल बिथरले; अंगावर आल्याने वृद्ध ३ फुट उंच फेकले गेल्याने जखमी

सांकेतिक क्रमांकाचे उकलले गूढ 

वैभवच्या आत्महत्येचा तपास करत असताना त्याच्या मोबाईलमध्ये वैष्णवीची हत्या केल्याचे लिहून ठेवले होते. या सोबतच LO1-501 हा सांकेतिक क्रमांक लिहून ठेवला होता. पोलिसांनी खारघर हिल परिसरात सात दिवस शोध मोहीम राबविली अखेर तो संकेतीक क्रमांक म्हणजे झाडाचा क्रमांक असल्याचे निष्पन्न झाल्यावर ड्रोनच्या सहाय्याने शोधले असता वैष्णवीचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा नवी मुंबई पोलिसांनी मोठया शिताफिने तपास करत हत्या आणि आत्महत्येचा उलगडा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com