Crime  Saam tv
क्राईम

Delhi Crime : दिल्लीतून गायब, हरियाणात लिव्ह इन, यूपीमध्ये मृतदेह; नाकातल्या चमकीनं उकललं गूढ, 'मृत' मुलगी जिवंत सापडली!

Delhi Crime : दिल्ली पोलिसांनी १९ वर्षीय बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Crime News : देशाची राजधानी दिल्लीमधून १८ जुलै २०२४ रोजी एक १६ वर्षांची मुलगी गायब होते. कुटुंबाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येते. पोलिसांनी त्या मुलीला तपासण्यासाठी दिल्ली पालथी घातली, पण मुलीचा शोध लागला नाही. ९ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश पोलिसांकडून एका मुलीच्या मृत्यूसंदर्भात दिल्ली पोलिसांना कळवण्यात येते. कारण, त्या मुलीचा चेहरा अन् देहभोली दिल्लीमध्ये बेपत्ता झालेल्या मुलीशी मिळतीजुळती होती. दिल्ली पोलिसांनी त्याचवेळी तात्काळ उत्तर प्रदेश गाठलं, सोबत त्या मुलीच्या आई-बाबांनाही घेतलं. तिथे पोहचल्यानंतर त्या मुलीच्या आई-बाबांनी ओळख पटवली. त्या मृतदेहावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कारही होतात..

पण दिल्ली पोलिसांना यात काहतरी गडबड असल्याचा संशय येतो, यूपीतील संभल येथे मिळालेला मृतदेह वेगळ्या मुलीचा असल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा तपास सुरु केला. धक्कादायक म्हणजे, दिल्ली पोलिसांचा संशय खरा ठरला, मुलगी जिवंत मिळाली.. मुलगी लिव्ह इनमध्ये राहत असल्याचं उघड झालं. दिल्ली पोलिसांनी १९ वर्षीय बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी नाकातल्या चमकीनं हे गूढ उलघडले अन् मृत मानलेली मुलगी जिवंत सापडली. या प्रकरणाची चर्चा दिल्ली पोलिसांत सुरु आहे.

दिल्लीमधून गायब झालेली १६ वर्षीय मुलगी बॉयफ्रेंडसोबत हरियाणामध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. दिल्ली पोलिसांनी राजधानी दिल्ली पालथी घातली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सुगाव लागला. त्यांनी एका कडीला दुसरी कडी जोडत हरियाणामध्ये दाखल झाले. पंचकूलामध्ये दिल्ली पोलिस पोहचले अन् त्या मुलीचा तपास सुरु केला. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सापडलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन आई-बाब शोक व्यक्त करत होते. पण दिल्ली पोलिसांनी जिद्द सोडली नव्हती. १२ ऑगस्ट रोजी दिल्ली पोलिसांनी २०० किमी दूर पंचकूलामध्ये त्या मुलीला जिवंत पकडले. ती बायफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

पंचकूलामध्ये पोलिसांनी त्या मुलीला पकडले. ती १९ वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लपून राहत होती. एक महिन्यापासून ते दोघे लिव्ह इन मध्ये राहत होते. दोघांनी एक घर रेंटवर विकत घेतले होते. तो १९ वर्षीय मुलगा पार्किंगमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होता. पोलिसांनी त्या मुलाला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय.

नाकातल्या चमकीनं उकललं गूढ -

याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्या मुलीच्या नाकातल्या चमकी सर्वात मोठा पुरवा ठरला. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, १८ जुलै रोजी आई-बाबांनी मुलगी गायब झाल्याचा रिपोर्ट दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुलगी डाव्या नाकात चमकी घालतात, असे सांगितले होते. उत्तरप्रदेशमध्ये मिळालेल्या मृतदेहाच्या नाकात उजव्या बाजूला चमकी होती. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी त्यानंतर तपास सुरु केला, सीसीटीव्ह तपासात हरियाणातील पंचकूलामध्ये पोहचले. त्यांनी तिला जिवंत पकडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT