Cyber Crime Saam tv
क्राईम

Cyber Crime : सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल; राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून नागरिकांची फसवणूक

Cyber Crime News : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल शोधली आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रं-दिवस काम करत आहेत. मात्र चोरट्यांकडून विविध थक्क करणाऱ्या मार्गाने चोरी केली जात आहे. अशीच आणखी एक घटना आता समोर आलीये.

लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल शोधली आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पैशांचे आमिष दाखवत लिंक आणि app शेअर करण्यास सांगितलं जातंय. लिंकवर क्लिक करताच अचानकपणे व्हॉट्सअॅपमधील ग्रुपचे लोगो बदलून बँकेचे लोगो DP म्हणून सेट केले जातायत.

यापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप, लाईटबील अन् अशा विविध मार्गांतून सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे अनोळखी फोन नंबर किंवा अनोखळी लिंक दिसल्यास लगेचच त्यावर क्लिक करू नये, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरात साधारण एका दिवसाला ४१ सायबर क्राईमच्या तक्रारी

पुणे शरहात तर एका दिवसात ४१ सायबर क्राईमच्या तक्रारींची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिली तर एका महिन्यात १२४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २५० हून अधिक तक्रारी आणि ३ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT