pune news saam tv
क्राईम

Cyber Fraud : जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष, स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लावलं; IT इंजिनिअरला ६९ लाखांचा गंडा

Pune News : पिंपरी चिंचवड येथे आयटी इंजिनियर तरुणाला स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून तब्बल ६९ लाख रुपयांनी लुटण्यात आले. सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • पिंपरी-चिंचवडमधील आयटी इंजिनियरची तब्बल ६९ लाखांची फसवणूक

  • सायबर पोलिसांनी मुंबई आणि ओडिसातून दोन आरोपींना अटक केली

  • स्टॉक मार्केट गुंतवणुकीवर दुप्पट नफा दाखवून विश्वास संपादन

  • गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू

पुणे हे आयटी आणि शिक्षणाचे हब म्हणून देशभरात ओळखले जाते. याचं पुण्यातील पिंपरी-चिंचवड मधून धक्कादायक घटना घडली आहे. स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका आयटी इंजिनियर तरुणाची तब्बल ६९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेने पुणे हादरलं आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील वाकड परिसरात राहणाऱ्या एका आयटी इंजिनियरला लाखोंचा फटका बसला आहे. स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ६९ लाख रुपये उकळण्यात आले आहे. "शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल" असे सांगून आरोपींनी विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास भाग पाडले.

तरुणाला ऑनलाइन माध्यमातून सुरुवातीला थोडाफार नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी मोठी रक्कम लाटली आणि अखेरीस पीडिताने तक्रार नोंदवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावे सुधांशू कुमार शाहू (ओडिसा) आणि प्रमोद मोहन गरुड (मुंबई) अशी आहेत. विशेष म्हणजे, प्रमोद मोहन गरुड हा स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहे.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणाला सोशल मीडिया आणि ऑनलाईन चॅट ग्रुपच्या माध्यमातून ‘गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळेल’ असे दाखवण्यात आले. सुरुवातीला लहान रकमेवर नफा दाखवल्याने पीडिताचा विश्वास बसला. त्यानंतर क्रमाक्रमाने मोठ्या रकमा पाठवण्यास भाग पाडण्यात आले. काही दिवसांनी त्याला कोणत्याही प्रकारचा नफा मिळणे थांबले आणि गुंतवलेले पैसे परतही मिळाले नाहीत. अखेरीस ६९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली.

पोलिसांनी तपासाच्या दरम्यान बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांचा मागोवा घेतला. त्यानुसार आरोपींचे लोकेशन ओडिसा आणि मुंबईपर्यंत पोहोचले. त्यानंतर विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आली आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी प्रमोद मोहन गरुड हा स्वतः टॅक्स कन्सल्टंट असून त्याने बेंगलोर येथे जाऊन सुधांशू कुमार शाहू यांच्या मदतीने गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याच पोलीस तपासात उघडकीस आल आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की ऑनलाईन स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गंडा घालणारे टोळके सक्रिय आहेत. तंत्रज्ञानाची जाण असणाऱ्या तरुणांनाही ते जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे हीच काळाची गरज असल्याचे सायबर पोलिसांनी अधोरेखित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT