ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवसेदिवस बँकिंग फ्रॉडला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे टाळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, जाणून घ्या.
अज्ञात ईमेल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करा. जर तुम्ही एखाद्या अज्ञात मेल किंवा संदेशात आलेल्या लिंकवर क्लिक केले तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते.
साधा पासवर्ड तयार करण्याची चूक करु नका, तुमच्या खात्यासाठी नेहमीच एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करा आणि वेळोवेळी पासवर्ड बदलत रहा.
फक्त अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करा, APK द्वारे कोणतेही अॅप डाउनलोड करु नका.
सायबर क्राइम टाळण्यासाठी अॅप्स आणि सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा, कारण अपडेट्समुळे सुरक्षा आणि प्राइवेसी मजबूत होते.
सार्वजनिक वायफाय वापरणे टाळा, यामुळे तुमचे खाते रिकामे करू होऊ शकते.
बँकिंग अॅप असो किंवा इतर कोणतेही अॅप, ते वापरल्यानंतर लॉग आउट कराआणि Keep me signed in हा पर्याय बंद ठेवा.