ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असते.
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील एक विशेष सण आहे. या सणात साप आणि नागांची पूजा केली जाते.
नागपंचमीला कोणती कामे करणे टाळावे, जाणून घ्या.
या दिवशी कोणत्याही तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू वापरु नका.
नाग पंचमीला जमीन खोदण्याशी संबंधित कोणतेही काम करु नका.
नाग पंचमीच्या दिवशी सापांना इजा करु नये.
नाग पंचमीच्या दिवशी झाडे आणि रोपे तोडणे अशुभ मानले जाते. नाग पंचमीच्या दिवशी शिवणकाम करणे देखील अशुभ मानले जाते.