ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनहेल्दी लाइफस्टाइमुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे. महिलांना पीसीओएस, मधुमेह यासारख्या समस्यांचा धोका जास्त असतो.
महिलांमध्ये फॅटी लिव्हरची कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
जर तुम्हाला पोटाच्या वरच्या भागात कोणत्याही कारणाशिवाय सौम्य वेदना जाणवत असतील तर ते फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.
फॅटी लिव्हरमुळे पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे भूक न लागणे, गॅस किंवा पोटफुगी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
वजन वाढणे हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे, विशेषतः जर तुमचे वजन जास्त न खाता वाढत असेल तर हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.
काहीही काम न करता जर सतत थकवा जाणवत असेल तर हे फॅटी लिव्हरचे लक्षण असू शकते.
फॅटी लिव्हरची समस्या महिलांमध्ये इस्ट्रोजेन आणि इतर हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम करू शकते, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.