ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लांबचा प्रवास, झोपेचा अभाव, सूर्यप्रकाश किवा प्रवासाचा ताण यामुळे मायग्रेन होऊ शकतो. प्रत्येक रुग्णासाठी मायग्रेनचे ट्रिगर पॉईंट वेगळे असू शकतात.
जर तुम्हाला प्रवासामुळे डोकेदुखी होत असेल, तर हे टाळण्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपाय करु शकता.
प्रवास करण्यापूर्वी चांगली झोप घ्या. थकवा आणि झोपेचा अभाव मायग्रेनचा त्रास वाढवू शकतो.
प्रवासादरम्यान पाण्याची कमतरता हे मायग्रेनचे एक प्रमुख कारण आहे. नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि भरपूर पाणी प्या.
रिकाम्या पोटी किंवा जड अन्न खाल्ल्याने मायग्रेन वाढू शकते. हलके, हेल्दी आणि वेळेवर जेवा.
गोंगाटाच्या वातावरणापासून तुमचे मन शांत राहावे म्हणून हेडफोन किंवा इअरप्लग सोबत ठेवा.
जर तुम्हाला आधीपासूनच मायग्रेनचा त्रास असेल तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधे सोबत ठेवा.