Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: व्यापाऱ्याच्या घरात आढळले ४ मृतदेह; पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पतीचं भयंकर कृत्य

West Bengal Crime News: पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

West Bengal Crime News :

पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली.

एकाच कुटुंबातील ४ लोकांचे मृतदेह घरात आढळले. बृंदावन कर्माकर (वय ५२), पत्नी देवाश्री कर्माकर आणि मुलगी देबलीना ( वय १७) आणि मुलगा उत्साह ( वय ८) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बृंदावन कर्माकर हे कपड्याचे व्यापारी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रविवारी खर्डा विभागात एम.एस मुखर्जी रोड येथे एका बंद घरात हे मृतदेह आढळून आले. बृंदाबन कर्माकर यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना आधी विष दिले. नंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. बृंदावन यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

तर इतर तीन मृतदेह फ्लॅटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली. त्यामध्ये पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे नमूद केले होते. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर संतापलेल्या कर्माकर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याने काही लोकांनी पोलिसांना कळवले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडावा लागला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. कर्माकर यांचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

Mumbai Central Railway : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेवर धावणार १५ डब्यांच्या लोकल गाड्या, गर्दीचा ताण होणार कमी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT