एक मोठी बातमी समोर येत आहे. डीलाईल रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एन एम जोशी पोलीस ठाण्यात बीएमसीच्या रस्ता विभागाकडून तक्रार दाखल करून इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यासंबंधी आदित्य ठाकरे आणि इतरांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शासकीय कामात अडथळा आणून डीलाईल रोडच्या दुसऱ्या लेनचे (Delai Road Bridge Lane) काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले, असं बीएमसी सूत्रांचं म्हणणं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या डीलाईल रोडवर इतर कामे अपूर्ण असून साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून ही लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेलं आहे. यातच अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांना एक पात्र लिहिलं आहे. यामध्येही त्यांनी डीलाईल रोड ब्रिज विषय मांडला आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, ''मुख्यमंत्र्यांना स्वतःच्याच जिल्ह्यात उद्घाटन करायला वेळ नसल्याने नवी मुंबई मेट्रोसारखी मेट्रो सेवा ५ महिने बंद ठेवली जाणे हे भयानक आहे. शेवटी माझ्या ट्रीट्स आणि पत्रकार परिषदांनंतर, सार्वजनिक दबाव वाढल्याने, सरकारने कोणतेही औपचारिक उद्घाटन न करता सेवा सुरू करण्यास सांगितले आहे.''
पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, वरळीतील डिलाईल रोड पुलाचीही अशीच स्थिती आहे, जिथे लांबणीवर पडलेल्या पुलाची दुसरी बाजू तयार होऊन १० दिवस लोटले तरी उद्घाटन खोळंबले आहे. हा परिसर देखील मुंबईचे व्यापार आणि औद्योगिक केंद्र आहे. येथे कामावर येणारे लोक, तसेच शेजारी राहणारे लोक आजवर रेल्वे मंत्रालयाच्या विलंबाबाबत सहनशील राहिले आहेत. आम्ही नागरिक या नात्याने हा पूल वापरण्यासाठी खुला केल्यावर, उदघाटनासाठी VIP ची वाट पाहण्यासाठी BMC आणि पोलिसांनी तो पुन्हा बंद केला आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.