येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने एका भारतीय महिलेला मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मूळची केरळची नर्स निमिषा प्रिया हिच्यावर तेथील एका येमेनी नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर भारतात प्रियाच्या कुटुंबीयांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयाला माहिती देण्यात आली की, येमेनमधील सर्वोच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबर रोजी येमेनच्या नागरिकाच्या हत्येप्रकरणी दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्ध निमिषा प्रियाची याचिका फेटाळली होती. आता या प्रकरणातील अंतिम निर्णय येमेनच्या राष्ट्राध्यक्षांवर अवलंबून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उच्च न्यायालयात निमिषा प्रियाच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये पीडिताच्या कुटुंबाशी 'ब्लड मनी' देऊन बोलण्यासाठी येमेनला जाण्याची परवानगी मागितली होती. येमेनला जाण्याच्या आईच्या विनंतीवर उच्च न्यायालयाने केंद्राला आठवडाभरात निर्णय घेण्यास सांगितले. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्येप्रकरणी निमिषा प्रियाला दोषी ठरवण्यात आलं आहे. निमिषाचे पासपोर्ट हे अब्दो महदी ताब्यात होते. तेच परत मिळवण्यासाठी तिने त्याला ड्रग्जचे इंजेक्शन दिले होते. ज्याच्या ओव्हरडोजमुळे त्याचा मृत्यू झाला, असा तिच्यावर आरोप असतो.
'ब्लड मनी' म्हणजे काय?
प्रियाच्या आईने या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि भारतीय नागरिकांना प्रवास बंदी असतानाही येमेनला जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी सांगितले की, आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना येमेनमधील मृत व्यक्तीच्या कुटुंबाशी 'ब्लड मनी' बद्दल बोलायचे आहे. ब्लड मनी म्हणजे गुन्हेगार किंवा त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुंबाला दिलेली भरपाई. प्रियाला 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.