Odisha Crime  Saam Tv
क्राईम

Crime News: शाळेत गेल्या पण घरी परत आल्याच नाहीत, जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह; २ मुलींसोबत नेमकं काय घडलं?

Odisha Crime News: ओडिशामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दोन मुली गुरूवारी शाळेमध्ये गेल्या पण त्या परत घरी आल्याच नाहीत. पालकांसह संपूर्ण गावाने मुलींचा शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीत. शनिवारी सकाळी या दोन्ही मुलींचे मृतदेह शाळेजवळील जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले. त्यामुळे ओडिशातील या गावामध्ये खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील बिलीगुडा गावाजवळील जंगलात दोन बेपत्ता विद्यार्थिनींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळ एकच खळबळ उडाली. या दोन्ही विद्यार्थिनी सातवीत शिकत होत्या. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या आणि पालकांसह गावकरी त्यांचा शोध घेत होते. दोन्ही विद्यार्थिनी एमव्ही ७२ गावामध्ये राहत होत्या. दोघी गुरूवारी शाळेत गेल्या पण परत घरी आल्याच नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांनी एमव्ही ७९ पोलिस ठाण्यात धाव घेत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

शनिवारी सकाळी गावातील काही महिलांना शाळेपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील एका आंब्याच्या झाडाला दोघींचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात होत्या, तसंच त्याचा मृतदेह टकत असलेल्या झाडाखाली त्यांच्या शाळेच्या बॅग देखील होत्या. त्यांच्या तोंडातून रक्त येत होते.

स्थानिक गावकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की, 'आम्ही प्रशासन आणि सरकारला आवाहन करतो की या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या.'मलकानगिरीचे एसडीपीओ सचिन पटेल आणि एमव्ही ७९ पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT