Bengaluru Crime
Bengaluru Crime Saam Tv
क्राईम

Bengaluru Crime : शिक्षणासाठी घर सोडलं, प्रियकरासाठी नवऱ्याला सोडलं; नंतर जोडप्यानं आयुष्य संपवलं, नेमकं काय आहे प्रकरण?

Bharat Bhaskar Jadhav

Bengaluru Live In Couple Crime News :

बेंगळुरूमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने स्वत: पेटवून घेतल्याची घटना घडलीय. बेंगळुरूच्या कोठानूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. पश्चिम बंगालमधील सौमिनी दास (२०) आणि केरळमधील अभिल अब्राहम (२९ ) अशी मृतांची नावे आहेत.(Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी या जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या जोडप्यामधील मृत महिलाही विवाहित होती. ती बेंगळुरूमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होती. त्यावेळी त्या नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या अभिल अब्राहमशी तिची ओळख झाली. त्या दोघांचं ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघांनी बेंगळुरू शहराच्या बाहेरील परिसरात डोड्डागुबी गावात एक फ्लॅटमध्ये एकत्र राहू लागले. सौमिनीने आपल्या नवऱ्याला वेगळं होत असल्याचं सांगितलं होतय. ती त्याच्यासोबत राहू शकत नाही असं तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी सौमिनीच्या नवऱ्याचा कॉल आला होता. त्यानंतर अभिल आणि सौमिनी यांच्यात काहीतरी चर्चा झाली.

परंतु या जोडप्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी जेव्हा या जोडप्याचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा ते त्याच्या फ्लॅटकडे धावले. परंतु शेजारी पोहोचूपर्यंत उशिर झाला होता. शेजारी जेव्हा त्या फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा सौमिनी जळून खाक झाली होती. तिचा मृत्यू झाला होता. तर अभिल हा अर्ध्या भाजलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना दिसून आला. त्यांनी त्याला व्हिटोरिया रुग्णालयात दाखल केलं. परंतु रविवारी उपचार चालू असताना त्याचाही मृत्यू झाला. या दोघांना आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे : खराडीमध्ये हाॅटेलला भीषण आग, अग्निशामक पथकाचे धाडस; 6 गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने टळला माेठा धाेका

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

PM Kisan Yojana: निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात जमा होणार २००० रुपये

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

SCROLL FOR NEXT