Explainer Mahadev Booking App: महादेव ज्यूस सेंटरवाला सौरभ कसा बनला 'सट्टा किंग'? कसा केला करोडो रुपयांचा खेळ

Mahadev Booking App: सट्टा किंग बनण्याआधी सौरभ चंद्राकर हा आधी ज्यूस विकत होता. भिलाई येथे त्याचा महादेव नावाचं ज्यूस सेंटर होतं.
Mahadev Booking App
Mahadev Booking AppSaam Tv
Published On

Explainer Mahadev Booking App:

केंद्र सरकारने २२ बेटिंग अ‍ॅपला बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान महादेव अ‍ॅप बेटिंग अ‍ॅपची चर्चा सर्वत्र होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महादेव बेटिंग अ‍ॅप आणि त्याचे संस्थापक सौरभ चंद्राकर यांनी छत्तीसगडच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीय. दरम्यान हे महादेव अ‍ॅपचा खेळ कसा होत होता? अ‍ॅपच्या संस्थापकानं कोट्यवधी रुपये कसे कमावलेत हे प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत. (Latest News)

केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिलेत. यामध्ये ‘महादेव बुक ऑनलाइन’ आणि ‘रेड्डियान्ना प्रेस्टोप्रो’या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. ईडी या अ‍ॅपच्या व्यवहाराचा तपास करत आहे. तुम्हाला माहितीये सट्टा किंग बनण्याआधी सौरभ चंद्राकर हा आधी ज्यूस विकत होता. भिलाई येथे त्याचा महादेव नावाचं ज्यूस सेंटर होतं. नंतर याच नावाचा सट्टा सौरभने चालू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्यूसचं दुकान चालवत असताना सौरभला ऑनलाईन अ‍ॅप्सवर सट्टा खेळण्याचा व्यसन लागलं. त्यात त्याने १० लाख ते १५ लाख रुपये गमावले. तर महादेव अ‍ॅपचा सहसंस्थापक रवी उप्पल हा सौरभचा मित्र आहे. त्यालाही ऑनलाईन सट्टा खेळाचं व्यसन होतं, त्यानेही त्यात १० लाख रुपये गमावले होते.

त्यानंतर या दोघांनी डोक्यात बुकिंग अ‍ॅप चालू करण्याचा विचार आला. दोघांनी पैसे जमवत महादेव बूक अॅप सुरू केलं. सौरभ चंद्राकरने या अ‍ॅपच नाव छत्तीसगडमधील भिलाई येथे असलेल्या ज्यूस सेंटरच्या नावावर नाव ठेवलं. हे अ‍ॅप भारतातील आणि युरोपातील कोडर्सने तयार केले आहे. या अ‍ॅपला २०२० मध्ये लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनी मिळून या अ‍ॅपचे २ हजारपेक्षा जास्त केंद्र सूरू केले आहेत.

सौरभ आणि रवी उप्पलने महादेव अ‍ॅपचा व्यवहार वाढवण्यासाठी कमीशन मॉडल स्वीकारलं. म्हणजे काय जे लोक या अ‍ॅपवर सट्टा खेळण्याचा केंद्र चालवत त्यांना कलेक्शनच्या हिशोबातून कमीशन दिलं जात असायचं. केंद्रांवर जमा झालेली मोठी रोकड हवाला नेटवर्कद्वारे दुबईला पाठवण्यात येत होते, असं ईडीच्या तपासात समोर आलंय. यामध्ये दाऊद इब्राहिमच्या टोळीतील माणसे त्याला मदत असायचे, असेही तपासात समोर आलंय.

महादेव बुक अ‍ॅपवर लोकांना अनेक प्रकारचे गेम्स ऑफर केले जातात. यात पोकर, कार्ड गेम, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेट यांचा समावेश आहे. पत्त्याच्या खेळांमध्ये लोकांना तीन पट्टी, पोकर आणि ड्रॅगन टायगरसारखे खेळ खेळले जातात. हे अ‍ॅप वेगवेगळ्या इन्स्टंट मेसेज अ‍ॅप (WhatsApp, Telegram) द्वारे चालवली जात. नेटकऱ्यांना मेसेजच्या माध्यमातून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी निमंत्रित केलं जात होते.

महादेव अ‍ॅपची मोडस् ऑपरेंडी

या अ‍ॅपच्या जाहिरातीमुळे अनेक बॉलिवूड कलाकरा अडकले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर अ‍ॅपच्या जाहिराती दिल्या. त्यानंतर या सेलिब्रेटींना हवाला ऑपरेटर्सद्वारे रक्कम देण्यात आली. तसेच १०० सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स सुद्धा यात अडकले आहेत. त्यांनीही महादेव अ‍ॅपचा प्रचार केला आहे. या अ‍ॅपच्या युझर्ससाठी अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही कॉल सेंटर्स आहेत. हे कॉल सेंटर्स नेदरलँड, नेपाळ, श्रीलंका, युएई मध्ये चालवण्यात येत होते. जो ग्राहक या सेंटर्सवर कॉल करायचा तेव्हा त्यांना एक व्हॉट्स अ‍ॅप नंबर दिला जात असायचा.

त्यात त्यांना त्यांचे तपशील भरावे लागत असायचे. त्यानंतर ग्राहकांचा हा तपशील भारतातील पॅनेल ऑपरेटरसोबत शेअर केला जातो. जे भारतातील शहरांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यरत आहेत. पॅनल ऑपरेटर्सची बनावट बँक खाती असून या खात्यांमध्ये पैसे वळवले जातात. तर ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी अ‍ॅप त्यांनी भरलेल्या रक्कमेचा ६० टक्के रक्कम परत करत. या पॅनेल ऑपरेटर्सचा दररोजचा सरासरी नफा २०० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

Mahadev Booking App
Booking Apps: केंद्र सरकारचा Betting APPला दणका; महादेव बुकिंग अ‍ॅपसह २२ अ‍ॅपवर बंदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com