Uttarakhand Cyber Crime: भाजीपाला विक्रेत्यानं सहा महिन्यात कमावले २१ कोटी; १० राज्यातील लोकांना घातला गंडा

Cyber Crime: लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यानंतर भाजीपाला विक्रेत्यानं लोकांना पार्ट टाईम नोकरीचं आमिष देत त्यांना गंडा घातलाय.
Cyber Crime
Cyber CrimeSaam Tv

Uttarakhand Cyber Thug Arrest:

उत्तराखंडमधील एका भाजीपाला विक्रेत्यानं अनेक राज्यातील लोकांना गंडा घातलाय. पार्ट टाईम नोकरी देण्याच्या बहाण्याने या भाजीपाला विक्रेत्यानं लोकांची फसवणूक करत तब्बल २१ कोटी रुपये कमावले होते. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी या भाजीपाला विक्रेत्याला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, या सायबर क्राइममध्ये आंतरराष्ट्रीय रॅकेट काम करत असून चीन, हाँगकाँगसारख्या देशातून हे गुन्हे ऑपरेटर केले जात आहेत. (Latest News)

सायबर क्राइम करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांचं नाव ऋषभ शर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ऋषभ हा फरिदाबाद येथे भाजीपाला आणि फळ विक्रीचं काम करत होता. कोरोनाकाळात लॉकडाऊन लागल्यानंतर त्याचं भाजी विक्रीचं काम बंद झालं. त्यानंतर त्याला त्याचा एक मित्र भेटला. त्याचा मित्र आधीपासूनच सायबर क्राईम करत होता. मित्राचे उद्योग पाहून ऋषभनेदेखील सायबर क्राइमच्या जगात पाऊल टाकले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपी ऋषभ शर्माला त्याच्या मित्राने काही लोकांचे फोन नंबर दिले. ऋषभ या लोकांना फोन लावून त्यांना पार्टटाईम नोकरीचा ऑफर देत असायचा. ऋषभ लोकांना बॉनवॉय इंटरनॅशनल हॉटेलमधील कर्मचारी असल्याचं सांगत असायचा. फोनवरील लोकांना नोकरीचं आमिष द्यायचा. आंतरराष्ट्रीय हॉटेलविषयी रिव्ह्यू लिहिण्याचं काम तो लोकांना देत असायचा. ज्या लोकांनी हॉटेलवर रिव्ह्यू लिहिला त्यांना तो पैसे देत असायचा.

सुरुवातीला तो रिव्ह्यू लिहिणाऱ्याला १० हजार रुपये मानधन देत असायचा. त्यानंतर जास्त पैसे कमावयचे असेल तर लोकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगायचा. यात अनेकजण भुलत आणि ते पैसे गुंतवत. त्यानंतर ऋषभचा फोन बंद होत असायचा. आरोपींनी अशाच प्रकारे देहराडूनमधील एका व्यावसायिकाला गंडा घातला होता. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली आणि त्याच्या सर्व बँक खात्यांची माहिती दिली. व्यावसायिकाने सांगितले की, हॉटेलमध्ये पैसे गुंतवण्यासाठी ऋषभने हॉटेलमधील एका मुलीशी त्याची ओळख करून दिली होती.

तसेच व्यावसायिकाला एक बनावट वेबसाइटही दाखवण्यात आली होती. यानंतर त्यांनी २० लाख रुपये गुंतवले. व्यावसायिकाने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ऋषभचा बंद येऊ लागला. याप्रकरणी पोलिसांनी ४ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांना सर्व बँक खाती गुरुग्राममध्ये असल्याचे आढळून आले. त्यानंतर २८ ऑक्टोबरला पोलिसांनी आरोपी ऋषभ शर्माला अटक केली. ऋषभवर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि आयटी अॅक्ट या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याच्यावर १० राज्यात ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ८५५ प्रकरणांमध्ये तो सहआरोपी असून ८९२ गुन्ह्यांचा तपास सुरूय. आरोपी ऋषभने चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केलाय. आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. चीन, सिंगापूर, हाँगकाँग आदी देशांमध्येही असे घोटाळे होत आहेत. या रॅकेटमधील मास्टरमाईंड सायबर क्राइम करण्यासाठी भारतात एजंट नेमणतात. या एजंट लोकांना मोठ्या रकमेचं रक्कम देत असतात.

Cyber Crime
Nandurbar Crime News : केळीच्या बागेत लावला गांजा; १७ लाख ७४ हजार रुपये किमतीचा २ क्विंटल ५३ किलो गांजा जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com