Mumbai Crime News: मुंबई विमानतळावर मिळणार भरघोस पगाराची नोकरी; खोटं आश्वासन देत तरुणांना लाखोंचा गंडा

Ford Job Vacancy: मुंबई विमानतळावर चालक म्हणून नोकरी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दीपक यांनी जॉबसाठी चौकशी केली.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai Crime:

मुंबई विमानतळावर चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन शेकडो तरुणांना गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलिसांनी आरोपीस अटक केली. विराज सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पर्फेक्ट कनेक्ट सोल्युशन या प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Bihar Crime News: रिक्षाचं भाडं मागताच प्रवासी संतापले; ड्रायव्हरला बेदम मारहाण करत गोळीबार

मुंबई विमान तळावर 40-50 हजार रुपये पगाराची नोकरी लावण्यासाठी विराज सिंग बेरोजगार तरुणांकडून हजारो रुपये उकळत असे. या फसवणूक प्रकरणात डी एन नगर पोलीस ठाण्यात 24 पेक्षा अधिक तरुणांनी संपर्क साधून तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्वेकडील आंबेवाडी परिसरात राहणारे दिपक हिरालाल सोलंकी मागील एक वर्षापासून नोकरीच्या शोधात होते, अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात पर्फेक्ट कनेक्ट सोल्युशनकडून मुंबई विमानतळावर चालक म्हणून नोकरी देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दीपक यांनी जॉबसाठी चौकशी केली.

परफेक्ट कनेक्शन सोल्युशनचे मॅनेजर विराज सिंग याने फिर्यादी दीपक यांना मुंबई विमानतळावर 45 ते 50 हजार रुपये पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी 35000 रुपये मागितले. पंचवीस हजार रुपये विमानतळावर आणि पोलीस वेरिफिकेशनसाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील अशी दीपककडे मागणी केली. यातील दहा हजार रुपये दीपकने विराज सिंग यांना दिले. दीड महिन्यानंतर ऑफिसमधून दीपकला सिलेक्शन झाल्याचा फोन आला. यावेळी रजिस्ट्रेशन म्हणून पंचवीस हजार रुपये भरण्यास देखील सांगण्यात आले. हे पैसे दीपकने चेकने कंपनीला दिले.

मात्र पैसे भरल्यानंतरही अनेक दिवस नोकरी मिळाली नाही. म्हणून दीपक वारंवार अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयात जाऊन चौकशी करत व फोनवर देखील चौकशी करत असे. मात्र पोलीस वेरिफिकेशन एअर इंडियाकडून क्लिअरन्स मिळाले नाही म्हणून थोडा उशिर लागत असल्याचे कंपनीकडून दीपकला सांगण्यात आले. अचानक पुन्हा ऑगस्ट महिन्यात पाच हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले आपली फसवणूक झाल्याचे दीपक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डी एन नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात फसवणुकीची तक्रार दिली.

डी एन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे तपास अधिकारी संतोष मसाळ यांनी गुन्हा दाखल करून आरोपीची चौकशी केली असता आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. म्हणून आरोपी विराज सिंग याला अटक देखील करण्यात आली तपासा दरम्यान त्याने 25 पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक केली असल्याचं स्पष्ट झाले असून अंदाजे 19 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याच्या खात्यात आढळून आली आहे. आरोपी सध्या डी एन नगर पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे.

Mumbai Crime News
Mumbai Crime News : मुंबई-जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबाराचं रहस्य उलगडलं; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com