Sambhajinagar News Saam Tv
क्राईम

Shocking : जन्मदात्रीने नवजात बाळाला पोत्यात गुंडाळलं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं, दैव बलवत्तर म्हणून...

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरामध्ये २४ वर्षीय तरुणीने नवजात बाळाला पोत्यात भरून कचऱ्यात फेकलं. मात्र कुत्र्यांच्या हालचालींमुळे नागरिकांना संशय आला आणि बाळाला वेळेत जीवदान मिळालं.

Alisha Khedekar

  • छत्रपती संभाजीनगरात आईने नवजात बाळाला पोत्यात भरून कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना

  • मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना संशय आल्याने बाळ सुखरूप वाचलं

  • बाळ सध्या रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

  • पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घेतला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर भागात मातृत्वाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीपासून विभक्त झालेल्या २४ वर्षीय तरुणीने अनैतिक संबंधातून झालेल्या गर्भधारणेनंतर बाळाला जन्म दिला आणि कुटुंबाला कळू नये म्हणून त्याच बाळाला पोत्यात टाकून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. सुदैवाने या चिमुकल्याचे प्राण वाचले असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका निरपराध जीवाला वेळेत जीवदान मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता (बदलेलं नाव) ही मूळची वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचा विवाह झाला होता, मात्र पतीसोबत पटत नसल्याने त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर ती छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिक नगरात राहू लागली आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली. याच दरम्यान तिची ओळख एका तरुणाशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनतर अर्पिता गर्भवती राहिली. कुटुंबापासून गर्भधारणा लपवण्यासाठी ती आपल्या गावी गेली आणि बाळाला जन्म दिला.

बाळाला जन्म दिल्यानंतर काही तासांतच तिने कुटुंबाच्या भीतीने स्वतःच्या हाताने नवजात बाळाला पोत्यात भरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरात येत डिव्हायडरवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले. पोत्यातून बाळाच्या किंचाळण्याचा आवाज येताच आसपासच्या मोकाट कुत्र्यांनी ते पोत ढिगाऱ्यातून बाहेर काढून रस्त्यावर आणले. त्याच वेळी त्या रस्त्यावरून एक बस गेली आणि पोत बसच्या दोन चाकांच्या मधोमध अडकलं.

याच वेळी कडा कार्यालयात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले भाग्येश पुसदेकर रस्त्याने जात होते. दरम्यान त्यांनी कुत्र्यांच्या हालचालींवर संशय घेत पोत्याकडे पाहिले असता त्यांना पोत्यातून बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी नागरिकांच्या मदतीने पोत उघडून बाळाला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की बाळाच्या शरीरावर कुत्र्यांच्या दातांचे काही घाव आहेत, मात्र सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांनी तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका महिलेचा संशयास्पद व्हिडिओ आढळून आला, मात्र तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. मात्र तिच्या पायातील उंच टाचांच्या चपलांनी पोलिसांचे लक्ष वेधले. पोलिसांनी परिसरातील तब्बल १५० महिलांची चौकशी केली आणि शेवटी एका अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर पोलिसांचा संशय बळावला. तिथेच त्यांना ती उंच टाचांची सॅंडल मिळाली.

महिलेची चौकशी सुरू केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु सीसीटीव्हीचे फुटेज दाखवल्यानंतर तिचे डोळे पाणावले आणि शेवटी तिने कबुली दिली. तिने स्वतःच्या मुलाला फेकून दिल्याचे मान्य केले. सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या संपूर्ण घटनेने पुंडलिक नगर परिसरातील नागरिक हादरले आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

SCROLL FOR NEXT