मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाड मधून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी महाडच्या नातेखिंड इथं एकत्र येऊन मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुंबईच्या दिशेने कूच केले.
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज मराठवाड्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करताय. त्यांना राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील बंद ठेवण्याचा निर्णय अडतीया असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलाय. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून निघायचे नाही. सरकारने आंदोलनाला मुदवाढ द्यावी. त्यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे, आजही अर्ज करूयात. समजासाठी शेवटपर्यंत लढणार आहे. शेवटपर्यंत मी मॅनेज होणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून आऱक्षण मिळण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : शेवटी मरण येईल, मी भोगायला तयार आहे. तुम्हाला रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिली आहे. पाच रूपये तिकीट आहे. संध्याकाळी रेल्वेतच झोपायचे. पाऊस अचानक येतो अन् अचानक जातो. त्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे.
काहीही झाले तरी समजाला किंमत द्या, समजाने विश्वासाने ५०० किमी पाठवलेय. तुमच्या डोक्यावर फक्त विजय हवाच. संयमाने लढा द्यायचा आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा..
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : समजासाठी वीर मरण द्यायला तयार आहे. पण मागे हटणार नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे तुम्ही वागू नका. आपल्या लेकाराला मोठं करायचं आहे. एखादा राजकीय कार्यकर्ता हट्ट धरेल, मला तिकडेच गाडी न्यायची. पण सरकार सहाकर्य करत तोपर्यंत आपणही सहकार्य करायचे. दारू पिऊन कुणीही गाड्या कुठेही घालू नका. समजाला मान खाली घालण्यासारखे वागू नका.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : सरकार पुढचेही सहाकार्य करेल, सरकारच्या हातात आंदोलनाला परवानगी देण्याचे आहे. आपण पुन्हा अर्ज करू. आपण समजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय, गडबड गोंधळात समाजाचे वाटोळ करू नका. आपण शिकलो नाही, दुसऱ्याच्या बुद्धीने चाललो म्हणून ७० वर्षे नेत्यांनी आपलं वाटोळं केले.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आपल्या रस्त्यावरील गाड्या काढायची आहे, पार्किंगमध्ये पोलीस सांगतील तिथे लावायची. स्वत तुम्ही स्वंयसेवक म्हणून काम करायची. दोन तासांत मुंबई रिकामी झाली पाहिजे. उपोषणाला बसल्यानंतर मला बोलता येणार नाही. पोलीस नाराज झाले नाही पाहिजे, वाहतूक कोंडी झाली, हे ऐकायला आलं नाही पाहिजे. आपण आझाद मैदानात यायचे होते आलो.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : कुणी जाळपोळ दडगफेक करायची नाही. सोमवारी-मंगळवारी महाराष्ट्राने सहकार्य नाही केले, तर मुंबईमध्ये पुन्हा यायचे. आरक्षणाची जबाबदारी माझ्याकडे, शांततेत राहून सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची.
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : सरकार सहकार्य नव्हते, म्हणून मराठे मुंबईत आले. सरकारने सहाकार्य केले. त्यांनी परवानगी दिली आहे. त्याबाबत सरकारचे कौतुकही केले. सरकारने सहाकार्य केले, त्यामुळे तुम्हालाही सहकार्य करायचे आहे.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला पर्यत्न करायचा. आपलं मुंबईत यायचे ठरलं होतं. आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. त्याप्रमाणे आपण इथे आलोय. आपलं उपोषण सुरू आहे. आता तुमची काय जबाबदारी आहे. सरकार आपल्याला सहाकार्य करणार नव्हते, त्यामुळे मराठा समाज घराघरातून निघाला होता.
Manoj Jarange Patil Protest Live Updates : माझं उपोषण सुरु झालं असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. सकाळी १० वाजल्यापासून हे उपोषण सुरु झालं आहे.आपलं आमरण उपोषण दहा वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही.
Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live : आझाद मैदानावर मराठ्यांचा जल्लोष, घोषणाबाजी सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केलेय. सर्वांनी शांततेत राहावे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचेय, तुम्ही शांत राहा असे आवाहन मनोज जरांगेंनी केले.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मराठा बांधव मुंबईला निघाले आहेत. आज सकाळपासून हातात भगवे झेंडे घेऊन तसेच डोक्यावर भगवी टोपी परिधान करून मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून 50% टिकणार आरक्षण मिळायलाच हवे या मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागणीला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेला निघाले आहेत.
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली आहे.
जरांगेंचा ताफा कर्नाक पूल परिसरात पोहचला आहे. थोड्याच वेळात ते आझाद मैदानात दाखल होणार आहेत. आझाद मैदानात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. जिकडे तिकडे भगवं वादळ घोंगावताना दिसत आहे. सीएसएमटी स्थानकातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.
Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai LIVE : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे यांच्यासोबत सहभागी होण्यासाठी पुण्यातून हजारो बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासाठी पुण्यातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. पुण्यातील कात्रजमधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा बांधव रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. पुण्यामधून देखील अनेक मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.
📍आझाद मैदान, मुंबई...!#MarathaReservation #OBCमधूनच_मराठा_आरक्षण pic.twitter.com/YIJAckYI5h
— Amol Aswale (@AmolAswale7) August 29, 2025
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. फ्री वे पासून पायी चालत जाण्याच्या सूचना पोलिसांकडून आंदोलकांना देण्यात आल्या आहेत. फ्री वेपासून आझाद मैदानाकडे मोजक्याच गाड्याने जाण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे. पोलिसांच्या सूचनेनंतर अनेक मराठा आंदोलक चालत आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सचूना देण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. त्यांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. गर्दी अधिक झाल्यानं वाहतूक मंदावली आहे. पायी चालणारे मराठेही रस्त्यावर चालत असल्याने मोठी गर्दी झाली आहे. पार्किंगमध्ये वाहने लावून मराठे आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत. आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
राज्यभरातून शेकडो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत. त्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागत प्रवास शक्यतो टाळवा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा कार्यकर्ते मुंबईकडे कूच करत आहेत. राज्यभरातून येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यासह राज्याचे इतर भागातून येणाऱ्या मराठा आंदोलकासाठी धाराशिवच्या तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी त्यांच्या मुंबईतील नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये निवासाची आणि जेवणाची तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली.
मुंबईमधील आझाद मैदानावर भगवं वादळ आले आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आंदोलानच्या ठिकाणी पोहचणार आहेत. आझाद मैदानावर मराठा आंदोलकांकडून जरांगेंवरील गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. मागे हटला नाही हटणार नाही, नेता लय खंबीर , तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर अशा गाण्यांनी सुरुवात झालीय. एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक आझाद मैदानावर दाखल झालेत.
थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. ९ वाजता मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसणार आहेत.
- मुंबईतील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकहून मराठा बांधवांचं मुंबईकडे कूच
- शेकडो वाहनांच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना
- नाशिकचं ग्रामदैवत कालिका मातेचं दर्शन घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना
- मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे
- शेकडो वाहनं, रेल्वेच्या माध्यमातून मराठा बांधव मुंबईकडे
- मुंबईतील आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून रसद पुरवणार
आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात आझाद मैदानावर ते दाखल होणार आहेत. राज्यभरातील लाखो मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दाखल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.