Maharashtra Live News Update: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५, गणेशोत्सव, मनोज जरांगेंचा मोर्चा, जरांगेंचे मुंबईत आंदोलन, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Beed: बीड जिल्ह्यात धुवाधार पाऊस; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे नदी नाल्याने धोक्याची पातळी ओलांडली असून बीड खरवंडी महामार्गावरील नवगणराजुरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे. काल झालेल्या जोरदार पावसामुळे नवगण राजुरी येथील डोमरी नदीला पूर आला असून यामुळे नवगणराजुरी सह पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ताटकळत बसावे लागले आहे एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे नदीवरील पाणी धोक्याची पातळी ओलांडली काही डोमरी येथील तलाव ओव्हर फ्लो झाला आहे कोणत्याही क्षणी तो धोक्याची पातळीवर लढू शकतो आणि पुलावरून जाणाऱ्या लोकांस धोका निर्माण होऊ शकतो म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाल्याने 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिकमधून आमदार सरोज अहिरे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांनी मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. नाशिकमधून आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या मराठा बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व अहिरे स्वतः दाखल झाल्या आहेत. मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून गरज पडल्यास आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होण्याची देखील तयारी आहे, सरकारने मराठा बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणीही सरोज अहिरे यांनी केलीय. तर सरोज आहिरे या मराठा नसताना त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला मात्र नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० हून अधिक आमदार मराठा असून त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, याची आम्हाला लाज वाटते, आगामी काळात मराठा बांधव या लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील असा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलाय.

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील एका घरात साकारली लाल महालची प्रतिकृती

पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे जगात भारी आणि त्यात अस्सल पुणेकर हे विविध आकर्षक, भव्य-दिव्य,आधुनिक आणि त्यासोबतच प्रबोधन पर देखावे सादर करतात. अशाच पुण्यनगरीतील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत संकेत सोपान बलकवडे यांनी त्यांच्या घरात लालमहाल तयार केला आहे. पुण्यनगरीतील लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या आठवणींचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे. राजमाता जिजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतला होता. याच महालात महाराजांचे बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.

आपला इतिहास अशा माध्यमातून आजपण जिवंत रहावा आणि त्यातून नागरिकांना सुद्धा त्याची महती कळावी या उद्देशाने ही प्रतिकृती बलकवडे यांनी साकारली आहे. हुबेहूब लालमहाल तयार करण्यासाठी संपूर्ण एक महिना लागला...

रत्नागिरीत शाळा दुरुस्तीचा संदेश देणारा इको फ्रैंडली गणपती

गणेशोत्सव म्हटल कि देखावे आलेच. मग ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असोत किंवा मग घरगुती गणपती असोत, अनेक ठिकाणी देखावे हे दिसत असतात. काही देखावे हे तर लक्षवेधी असतात, तर काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचाही अनेकजण प्रयत्न करत असतात, तर काही देखाव्यांमधून आपल्या आजूबाजूला घडत असणारी सत्य स्थिती मांडली जाते. रत्नागिरीतल्या कुवारबाव येथील अजय वर्तक यानीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या घरी असाच एक देखावा साकारला आहे. वर्तक कुटुंबीयांनी साकारलेल्या गणेशमूर्तीच्या देखाव्यातून शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज यावर्षीच्या देखाव्यातून मांडली आहे.. गणेशोत्सवात गणपती बापाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेशभक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून केला आहे

Dharashiv: धाराशिवमध्ये २ दिवसांपासून वातावरणात बदल, सूर्यदर्शन नाही

धाराशिव -

धाराशिवमध्ये २ दिवसांपासून वातावरणात बदल, सूर्यदर्शन नाही

आज सकाळपासून पावसाने केली सुरुवात,जिल्ह्यातील उमरगा परिसरात नदी नाल्यांना पूर

Hingoli: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी 

हिंगोली -

मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना हिंगोलीच्या वसमत आणि औंढा तालुक्यात सुट्टी जाहीर

वसमत विभागाचे उपविभागीय अधिकारी

विकास माने यांचे आदेश

Pune: पुण्यात काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस

पुणे -

पुण्यात काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस

पावसातही गणेश भक्तांचा उत्साह

छत्र्या घेऊन देखावे पाहण्यासाठी आलेले पुणेकर भाविक

गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी घरातील दीड दिवसाचा गणपती बुडवल्यानंतर देखावे पाहिला घराबाहेर पडलेले पुणेकर

Pune: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज पहाटे चंडा वादन

पुणे -

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज पहाटे चंडा वादन

नादब्रम्ह कलावेदी ग्रुप तर्फे चंडा वादन" करण्यात आले

2019 पासून प्रत्येक वर्षी हा ग्रुप हे वादन गणपती समोर सादर करत आहे

तसेच विसर्जन मिरवणूकित देखील हा ग्रुप सहभागी असतो

Pune: महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण

पुणे -

महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी उत्पन्न जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर इत्यादी प्रवेश घेतेवेळी कागदपत्र लागतात

राज्य शासनाने हे दाखले शाळेतच मिळावेत यासाठी योजना सुरू केली आहे

पुणे जिल्ह्यात शहरासह 400 आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत

या सेवा केंद्रातून दाखले कसे द्यावे यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे

Pune: "कृत्रिम फुलावर बंदी घाला",कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्राद्वारे मागणी

पुणे -

"कृत्रिम फुलावर बंदी घाला",कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्राद्वारे मागणी

गौरी गणपती मध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी बनावटीच्या कृत्रिम फुलावर बंदी घालावी

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून मागणी

गौरी गणपती सणात मोठ्या प्रमाणात चिनी बनावटी कृत्रिम फुले बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे

कृत्रिम आणि सिंथेटिक फुलांवर बंदी आणली तर शेतकऱ्याने आणलेल्या फुलांना चांगला भाव मिळेल असे या पत्रात म्हटलं आहे

Nagpur: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेला प्रारूप आराखडावर आतापर्यंत 12 आक्षेप सादर

नागपूर -

- नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेला प्रारूप आराखडावर आतापर्यंत 12 आक्षेप सादर

- प्रारूप आराखड्यावर भाजपने समाधान व्यक्त केलं असलं तरी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेय...

- काँग्रेस शिवाय बसपा आणि आपने देखील प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदविल्या आहे.

- गुरुवारी मनपाच्या मुख्यालयात चार आणि लकडगंज झोनमध्ये एक अशा पाच हरकती सादर झाल्यात

- 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. त्यावर पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान एकत्र सुनावणी होणार आहे.

- 4 सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचनेचा आकडा वाढणार आहे.

Nagpur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

नागपूर -

- रवीभवन मधील कॅबिनेट मंत्र्यांचे बंगले तसेच नागभवन मधील राज्यमंत्र्यांची बंगले पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

- रवी भवन मध्ये 30 कॉटेज आणि नागभवन मधील 16 कॉटेज आहे.. यात उद्योगमंत्री मुक्कामी असताना राविभवन मधील कॉटेज 13 मधील पिओपी छत कोसळले होते

- तसेच लाकडी स्ट्रक्चर ऊदळीने पोखरल आहे... त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने याच ऑडिट केलं जाणार आहे

- यासाठी व्हिएनआयटीला यासाठी 14.16 लाख रुपयाचा निधी वळता केला आहेय

Nagpur: नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती

नागपूर -

- नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती

- नागपूर मनपात २४५ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालीय, आता पुन्हा मेगा भरती होणार

- मनपाच्या विविध दहा संवर्गातील १७४ पदांची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू

- जवळपास दोन दशकानंतर नागपूर मनपात येवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होत आहे

- अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे

Latur: संततधार पावसामुळे लातूर  जिल्ह्यात जनजीवन पूर्णत: विस्कळीत

लातूर -

संततधार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन पूर्णता विस्कळीत

जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर.

30 महसूल मंडळात अतिवृष्टी.

50 रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद.

Amravati: उद्यापासून राज्यभर बच्चू कडू काढणार शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा

अमरावती -

उद्यापासून राज्यभर बच्चू कडू काढणार शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा

उद्या वाशिम जिल्ह्यातून करणार शुभारंभ..

बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बच्चू कडू ठाम.संपूर्ण राज्यात बच्चू कडू सभा घेणार

2 ऑक्टोबर ऐवजी 28 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये बच्चू कडूचे कर्जमाफीसाठी मोठ आंदोलन

Wardha: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वर्ध्यात घर आणि गोठ्याचे नुकसान

वर्धा -

- वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घर आणि गोठ्याचे नुकसान

- समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील घटना

- घरासह गोठ्यावरील छत उडाल्याने नुकसान

- छत उडाल्याने घरातील साहित्य पावसात भिजले

- गोठ्यांवरील टिनपत्रांचे छत उडाल्याने वैरण भिजून नुकसान

- मदत देण्याची मागणी

- सततच्या पावसामुळे परिसरात शेतीपिकांचेही नुकसान

- प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी

Nanded: नांदेड जिल्ह्यात पावसाचे सलग दुसऱ्या दिवशीही थैमान

नांदेड -

नांदेड जिल्ह्यात पावसाचे सलग दुसऱ्या दिवशीही थैमान.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.

नांदेड शहरात पाणीच पाणी.

नांदेड शहरातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप.

नांदेड शहरातील अनेक खराब शिरले पावसाचे पाणी.

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.

बचाव कार्यासाठी एचडीआरएफ, सीआरपीएफ, आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तैनात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com