Washim News  Saam Tv
क्राईम

Shocking News : "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर...", १७ वर्षीय मुलीला धमकी; तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Washim News : वाशीम जिल्ह्यातील अंबापूरमध्ये १७ वर्षीय मुलीने टवाळखोरांच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणात दोन आरोपी अटकेत असून तिसरा फरार आहे.

Alisha Khedekar

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील अंबापूर गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गावातील टवाळखोरांनी "माझ्याशी फोन वर बोल" असा सतत दबाव टाकल्याने कंटाळलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे.

या तरुणीला "माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला ठार मारू" अशी धमकी पीडितेला देण्यात आली. या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही टवाळखोर पीडित युवतीला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत धमकी देत होते. आरोपींनी 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू,' अशी धमकी देत पीडित मुलीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दोन दिवसा पूर्वी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्या भरात ही दुसरी घटना असून महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान या घटनेने वाशीम शहर हादरलं आहे. धमकीला घाबरुन मुलीनं टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आतिश चवरे, अमोल टोणे यांना अटक केली आहे. तसेच एक आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Nashik Tourism : नाशिकला गेलाय? मग 'हा' ऐतिहासिक किल्ला नक्की पाहा

SCROLL FOR NEXT