Washim Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटमारी; ट्रक लुटणारी टोळी ताब्यात, ट्रकसह पशुखाद्य जप्त

Washim news : पशुखाद्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला चौघांनी अडवून चालकाला चाकू दाखवून ट्रक घेऊन पसार झाले होते. यानंतर पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास करत चारही जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले
Washim Crime News
Washim Crime NewsSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या कारंजा ते अमरावती मार्गावर चाकूचा धाक दाखवून ट्रक लुटण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच लुटमारी करणाऱ्या टोळीचा वाशिम पोलिसांनी काही तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून लुटलेला ट्रक आणि त्यामधील पशुखाद्य पोलिसांनी जप्त केले आहे. 

अमरावती येथून एक ट्रक वाशिमकडे पशुखाद्य घेऊन मार्गस्थ झालेली होती. यावेळी कारंजा ते अमरावती मार्गावर पाच जणांनी ट्रकला अडविले आणि चालकाला चाकूचा धाक दाखवून ट्रक ताब्यात घेतला. यानंतर चोघेजण ट्रकसह पसार झाले होते. या प्रकरणी वाशीम पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर वाशिम पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून तपास करण्यास सुरवात केली. 

Washim Crime News
Farmer : पश्चिम विदर्भात ५२७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; सहा महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी

२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत या पाच आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. तर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लुटलेला ट्रक आणि संपूर्ण पशुखाद्य असा २५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या टोळीचे आणखी सदस्य आणि त्यांच्या नेटवर्कचा शोध सुरु आहे.

Washim Crime News
Akkalkuwa : बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस अडकली चिखलात; भर पावसात प्रवाशांचे हाल

कार अडवून लुटमारी करणारे ताब्यात  

धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पुरमेपाडा येथे ५ जुलै रोजी कारला अडवून आठ गुन्हेगारांनी जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम लुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यासंदर्भात धुळे तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच धुळे तालुका पोलिसांना या गुन्ह्यातील चौघांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com