Chhattisgarh Crime news Saam Tv
क्राईम

Shocking: तरुण बनला हैवान! कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या, नंतर मृतदेहाजवळ गाणी गात बसला

Chhattisgarh Crime News: छत्तीसगडमध्ये तरुणाने आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर आरोपी आईच्या मृतदेहाजवळ बसून जोरजोरात गाणी गात राहिला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

छत्तीसगडमध्ये भयंकर घटना घडली. एका तरुणाने आईची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आईच्या मृतदेहाचे तुकडे करून हा तरुण तिथेच जोरजोरात गाणी गात बसला. स्थानिक ग्रामस्थांनी या तरुणाच्या घराच्या दिशेने धाव घेतली तर ते चित्र पाहून घाबरले. कारण आईची हत्या करून रक्ताच्या थारोळ्यात बसून हा गाणी गात बसला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली. तरुणाने कुऱ्हाडीने सपासप वार करत आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि तिथेच गाणं गात बसला. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे. सुरूवातीच्या तपासातून तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहेत. तरुणाचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच खरं कारण समोर येईल.

स्थानिक नागरिकांनी या तरुणाबाबत धक्कादायक माहिती सांगितली. आरोपी तरुण बऱ्याच वर्षांपासून विचित्र कृत्ये करत होता. तो एकटाच जोरजोरात गाणी वाजवायचा आणि लोकांपासून लांब राहायचा. जेव्हा या तरुणाच्या घरातून जोरजोरात गाण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आम्ही त्याच्या घरी गेलो. तेव्हा परिस्थिती आणि दृश्य पाहून आम्ही खूपच घाबरलो. हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात बसला होता.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हत्येचे कारण कौटुंबिक वाद होता की तो खरोखर मानसिक आजाराने ग्रस्त आहे हे शोधण्यासाठी आरोपीची पोलिस सतत चौकशी करत आहेत. जशपूरमधील हे हत्याकांड संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे आणि या घटनेने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारचा दिवस कसा जाणार? आवडत्या व्यक्तीशी झालेलं भांडण आजतरी मिटेल का? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लेखी आश्वासन दिल्यानंतरच उपोषण सोडणार, उपोषणकर्ते दिपक बोऱ्हाडे उपोषणावर ठाम...

Instant Jalebi Recipe : कुरकुरीत अन् रसरशीत जिलेबी, दसऱ्याला जेवणाची वाढेल रंगत

Asia Cup Final : पावसामुळं भारत-पाकिस्तान फायनलचा सामना रद्द झाला तर कोण ठरणार चॅम्पियन? जाणून घ्या नियम

Leh Ladakh violence: सोनम वांगचुकचं पाकिस्तानशी कनेक्शन? शत्रू राष्ट्राला पाठवले आंदोलनाचे व्हिडिओ, तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT