Shreya Maskar
इन्स्टंट जिलेबी बनवण्यासाठी साखर, पाणी, पिवळा खायचा रंग, मैदा, मीठ, फ्रूट सॉल्ट, केशर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
इन्स्टंट जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवून साखर आणि पाणी मिक्स करून पाक तयार करा.
साखर विरघळल्यानंतर पाकातील पाणी आटवून घ्या.
पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून त्यात खायचा पिवळा रंग आणि थोडे केशर मिक्स करा.
एका ताटात मैदा, मीठ, पाणी आणि फ्रूट सॉल्ट घालून मिश्रण मिक्स करा.
आता पायपिंग बॅगमध्ये तयार मैद्याचे मिश्रण भरून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत जिलेबी तळून घ्या.
जिलेबी तयार झाल्यानंतर ती गरम साखरेच्या पाकात सोडा आणि थोड्या वेळाने तिचा आस्वाद घ्या.