Virar Crime: मुलीला पाठवला मेसेज; तरुणाला बॉयफ्रेंडनं भररस्त्यात केली मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू|Video Viral

Virar Youth Beaten: विरारमध्ये एक धक्कादायक गुन्हा घडलाय. इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्यानंतर एका २४ वर्षीय तरुणाला मुलीच्या प्रियकराने मारहाण करून ठार मारले. हा क्रूर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Virar Youth Beaten
Shocking crime in Virar – Youth beaten to death in public over Instagram message, video virasaam tv
Published On

प्रेयसीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवल्याच्या कारणावरून मुलीच्या बॉयफ्रेडनं भररस्त्यात तरुणाला मारहाण केली. या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू झालाय. ही धक्कादायक घटना विरारमध्ये घडलीय. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय. (Instagram Chat Turns Fatal: Virar Youth Killed by Girlfriend’s Boyfriend)

प्रतिक वाघे (२४) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे.तो नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव परिसरात राहणारा होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मोरेगाव तलावाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुलीचा प्रियकर भूषण पाटील आणि त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण केली. मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Virar Youth Beaten
Shocking : रत्नागिरी हादरलं! पोटच्या मुलाने आधी केली आईची हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं

प्रतिक वाघे याने नालासोपार्‍़यात राहणार्‍या एका तरुणीला इस्न्टाग्रामवर मेसेज पाठवला होता. मेसेजवर त्याने तिला भेटायला बोलवलं होतं. ही बाब मुलीच्या प्रियकराला समजली. त्यानंतर मेसेज करणाऱ्या प्रतिकला धडा शिकवायचा म्हणून भररस्त्यात त्याने आपल्या मित्रांना घेऊन त्याला मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.

Virar Youth Beaten
Dharashiv : स्मशानभूमी जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा; पोलीस गाड्यांवरही दगडफेक, दहा जण जखमी

दरम्यान प्रतिकला मारहाण होत असताना त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. प्रतिक नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव परिसरात राहत होता. या मारहाणीत जखमी असलेल्या प्रतिकवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचा प्रियकर भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com