Sakshi Sunil Jadhav
तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर आज त्यामध्ये सुधारणा होईल. गैरव्यवहार पासून स्वतःला चार हात लांब ठेवा.
जोडीदाराचे म्हणणे काय आहे हे ऐकून घेऊन आज पुढे जावे लागेल. संसारिक सुखात साखरे सारखी गोडी वाढेल. महत्त्वाचे निर्णय आणि बैठका आज पार पडतील .
आजोळी प्रेम वाढेल. मामाचे विशेष सहकार्य मिळेल. आपल्या वृत्तीत बदल करावा लागेल. हित शत्रूंचा त्रास वाढेल.
सृजनशीलता वाढीस लागणार आहे. नवनवीन कल्पना आणि युक्ती आपल्यातील प्रज्ञा वर्धित ठरतील. दिवस चांगला आहे.
जनावरांशी निगडित व्यवहार होतील. शेतीवाडी मध्ये विशेष लक्ष घाला. घरातील मोठ्या व्यक्तीच्या सल्ल्याने पुढे जाण्याची योग आहेत. प्रगती मार्गावर पाऊल ठेवा.
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा आजचा दिवस आहे. भावंड सौख्य उत्तम आहे. शेजारी संबंध दृढ होतील.
"प्रयत्नांती परमेश्वर" असा दिवस आहे. पैसे मिळवण्यासाठी विशेष कष्ट घ्याल. संपत्तीचे निर्णय आज मार्गी लागणार आहे. जोडीदाराची तब्येत जपावी लागेल.
"मै जिंदगी का साथ निभाता चला गया" असा दिवस आहे. जे येईल, पदरात पडेल ते सुखाचे मानून घ्यायला सकारात्मकता वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे.
जाणता अजाणता चुका होणार आहेत. बंधन योग आहेत. दवाखान्यासाठी विनाकारण पैसे खर्च होतील. वस्तू गहाळ होईल.
एखाद्या गोष्टीने पेटून उठाल. अनेकांना बरोबर घेऊन कामे कराल. पुढारीपणाची भावना होईल. सामाजिक क्षेत्रात पत वाढेल.
लांबचे प्रवास होतील. प्रवासामध्ये नव्या ओळखी होतील. ज्या पुढील कामासाठी तुम्हाला फायदाच्या ठरतील.
शोभेची बाहुली होऊन राहू नका. प्रेमामधील बारकावे ओळखून वागणे आज गरजेचे आहे. कामात व्यत्याय येतील.