Maharashtra Crime News:  Saamtv
क्राईम

Crime News: दोन दिवसांपासून बेपत्ता होता, भयंकर अवस्थेत मृतदेह आढळला, छत्रपती संभाजीनगर हादरलं; तरुणासोबत काय घडलं?

Maharashtra Crime News: दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. राजेश विजय कापसे (वय ३५, रा. विजयनगर) असे या तरुणाचे नाव असून, तो व्यवसायाने पेंटर होता.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर, ता. ११ सप्टेंबर २०२४

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह सापडल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. राजेश विजय कापसे असे या तरुणाचे नाव असून कामानिमित्त झाल्टा फाटा येथे जात असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय. कामानिमित्त झाल्टा फाटा येथे जात असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. राजेश विजय कापसे (वय ३५, रा. विजयनगर) असे या तरुणाचे नाव असून, तो व्यवसायाने पेंटर होता.

राजेश हे पत्नी आणि मुलासह विजयनगर भागात राहतात. ८ सप्टेंबरला दुपारी चार वाजता राजेश कामानिमित्त झाल्टा फाटा येथे जात असल्याचे पत्नीला सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. ते अनेकदा कामानिमित्त बाहेर गेल्यावर बाहेरच राहत असल्यामुळे पत्नीनेही कोणाला माहिती दिली नाही. मात्र, ९ सप्टेंबरला त्यांचा संपर्क झाला नाही. राजेश यांची पत्नी कोमल यांनी राजेशची बहीण रेखा जालिंदर शिरसाठ यांना माहिती दिली.

जालिंदर शिरसाठ यांनीही त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु, राजेश यांचा काहीही शोध लागला नाही. मंगळवारी त्यांनी पुंडलिकनगर ठाणे गाठले. अशातच मंगळवारी संध्याकाळी धुळे- सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील झुडपांमध्ये शिर नसलेला मृतदेह आढळला. तेथून जवळच त्याचे शिर टाकलेले होते. करमाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. ही हत्या नेमकी का आणि कोणी केली? याबाबत आता सविस्तर तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT