crime news marathi  Saam tv
क्राईम

Crime : धक्कादायक! एकाला अॅसिड टाकून जाळलं, दुसऱ्याला कोयत्याने भोकसलं, संभाजीनगर हादरलं!

Chhatrapati Sambhajinagar crime news marathi : छत्रपती संभाजीनगरमधील घटनेमुळे खळबळ माजली. एका व्यक्तीला अॅसिडने जाळलेय.

Namdeo Kumbhar

माधव सावरगावे

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पैशाच्या दैवाणघेणावीवरुन भयंकर घटना घडली आहे. तीन जणांनी दोन व्यक्तींवर जिवघेणा हल्ला केला. एका व्यक्तीला चाकू कोयत्याने भोकसलं, त्यानंतर एका व्यक्तीला अॅसिडने जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. खुलताबाद येथील कागजीपुराजवळ मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

एका व्यक्तीला चाकू अन् कोयत्याने सपासप वार केले. तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर अॅसिड टाकून जाळण्यात आले. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खुलदाबाद पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलेय. उपविभागीय पोलीस अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

आनंद बाबासाहेब वारे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पोलिसांपुढे जबाब नोंदवला. वारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, आकाश कैलास रणधीर हा मंगळवारी रात्री वेरुळला जायचं म्हणून दुचाकी घेऊन आला. त्याच्यासोबत वेरूळला मयूर पाटणी याच्या लॉजवर गेलो. पण तिथे गेल्यानंतर मयूर पाटणी याने नंद्राबादजवळच्या परमीट बारवर बोलवलं. मयूरसोबत तिथे नितीन ठाकरे देखील होता. परमीट बारवर सर्वांनी दारु प्यायली. रात्री साडेअकराच्या सुमारास शेख नावेद त्याठिकाणी आला. मयूर पाटणीने आकाशला सात हजार रूपये दिले. मात्र, आकाशने अजून दहा ते १२ हजार मागितले. त्यावेळी दोघांमध्ये थोडीबाचाबाची झाली.

त्यावर मयूर पाटणी याने आम्हाला दोघांना (आकाश रणधीर व आनंद वारे) हॉटेलच्या मागे घेवून गेला. मयूरने अचानक आनंद वारेचे तोंड दाबून पाठीवर, पोटावर चाकू-कोयत्याने वार केले. शेख नावेदने चाकूने आकाशच्या पोटावरवर वार केले. त्या हल्ल्यातून वाचण्यासाठी वारे याने पळ काढला. मित्राच्या मदतीने त्याने घाटी रुग्णालय गाठले. आकाश यालाही उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेहण्यात आले. पण आकाशच्या डोळ्यावर, तोंडावर सगळ्या अंगावर अॅसिड टाकण्यात आले. उपचार सुरु असताना आकाशचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे वाहतूक उशिराने; प्रवासी ट्रॅकवर उतरले

Besan Ladoo Recipe: दिवाळीला खमंग बेसनचे लाडू बनवणार आहात? 'ही' ट्रिक वापरा, लाडू वळताना तुटणार नाहीत!

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठा बदल! २४, २२ आणि १८ कॅरेटचे नवे भाव वाचा

Rahul Gandhi Accident : राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची जोरदार धडक

Face Wash : दिवसातून किती वेळा फेसवॉशने चेहरा धुवावा? ग्लोइंग स्किनसाठी फेसवॉश किती वापरावा?

SCROLL FOR NEXT