Nagpur Family Ended Life
Nagpur Family Ended Life

Nagpur : तिघांचे हातपाय बांधले होते, मग स्वत: गळफास घेतला, सामूहिक आत्महत्या प्रकरणाचे गूढ वाढले

Nagpur Family Ended Life : दरवाजा उघडताच थरकाप, शिक्षकाने अख्ख्या कुटुंबासह आयुष्य संपवलं, सामूहिक आत्महत्याने उपराजधानी हादरली
Published on

Nagpur Suicide Case : धुळ्यात काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची चर्चा थांबत नाही तोच आता नागपूरमधून अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील मेवाड येथे एकाच कुटुंबातील चार जणांना सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले? याची उलटसुलट चर्चा सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, तीन मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते. त्यामुळे नागपूर आत्महत्या प्रकरणाचे गूढ आणखी वाढलेय.

विजय पचोरी (वय, ६८) त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी (वय, ५५) मुलगा दीपक पचोरी (वय, ३८) व गणेश पचोरी (वय, ३८) अशी मृतांची नावे आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांच्या पत्नी गृहिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur Family Ended Life
Nagpur Crime: पती- पत्नी अन् २ मुले, घरात आढळले चौघांचे मृतदेह; भयंकर घटनेने नागपुर हादरलं

कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले ?

मेवाडमधील अख्ख्या कुटुंबाने आयुष्य संपवल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. मृतामध्ये दोन मुलं, पत्नी आणि नवऱ्याचा समावेश आहे. या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. पण याप्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. ही आत्महत्याच आहे का? की नवऱ्याने आधी तिघांना संपवले आणि मग स्वत:ही टोकाचे पाऊल उचलले? कुटुंबाला कुणाचा त्रास होता का? या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

तिघांचे हातपाय बांधले, मग स्वत: गळफास घेतला?

घरात पोलिसांना चार मृतदेह आढळले. यामधील तीन मृतदेह हे हात पाय बांधलेल्या अवस्थेत होते. तर एक मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तिघांचे हातपाय बांधून फाशी दिल्यानंतर चौथ्या व्यक्तीने स्वतः गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com