Chandrapur Crime samm tv
क्राईम

Chandrapur Crime: घरगुती वाद टोकाला गेला, महिलेने नवऱ्याला संपवलं; रुमालाने गळा आवळला अन्...

Chandrapur Police Killed Case: चंद्रपूरमध्ये नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याची हत्या केली. रुमालाने गळा आवळून नवऱ्याला संपवण्यात आले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

चंद्रपूरमध्ये महिलेने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या जामसाळा या गावात ही घटना घडली. बायकोने नवऱ्याची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरगुती कारणावरून ही घटना घडली असली तरी हत्या नेमकी कशासाठी केली गेली याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी सिंदेवाही पोलिस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्वास बाबूराव चौधरी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वैशाली दुर्वास चौधरी असे आरोपी महिलेचे नाव आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत्यू झालेल्या व्यक्तीची आई सुनंदा बाबुराव चौधरी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. सिंदेवाही पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

घरगुती वादातून बायकोने नवऱ्याची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली. हत्या झालेल्या व्यक्तीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा दुर्वास बाबुराव चौधरी (वय ३५ वर्षे) आणि सून वैशाली दुर्वास चौधरी (वय ३२ वर्षे) यांच्यात काल सकाळी घरगुती वाद झाला होता. या वादातून वैशालीने रागाच्या भरात दुर्वास यांची रुमालाने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात अप.क्र. २१०/२०२५ कलम १०३ (१), ११५ (२), ३५२ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत मृत दुर्वास चौधरी यांची पत्नी आणि आरोपी असणाऱ्या वैशाली दुर्वास चौधरीला अटक केली. घटनेमुळे जामसाळासह तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास सिंदेवाही पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT